AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अलविदा! माझी वेळ संपलीय’; खुर्चीत बसताच शेतकरी नेत्याचा मृत्यू

पंजाबच्या अमृतसरमध्ये एका सभेत कृषी विधेयकावर हल्ला केल्यानंतर भर सभेतच एका शेतकरी नेत्याचा मृत्यू झाला आहे. (Punjab farmer leader Datar Singh dies of heart attack)

'अलविदा! माझी वेळ संपलीय'; खुर्चीत बसताच शेतकरी नेत्याचा मृत्यू
| Updated on: Feb 22, 2021 | 3:40 PM
Share

अमृतसर: पंजाबच्या अमृतसरमध्ये एका सभेत कृषी विधेयकावर हल्ला केल्यानंतर भर सभेतच एका शेतकरी नेत्याचा मृत्यू झाला आहे. अलविदा! माझी वेळ संपलीय, असं म्हणत हा शेतकरी नेता खुर्चीत बसला अन् लगेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. भरसभेतच आपल्या लाडक्या नेत्याचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. (Punjab farmer leader Datar Singh dies of heart attack)

दातार सिंग असं या शेतकरी नेत्याचं नाव आहे. ते पंजाबच्या कीर्ती किसान युनियनचे नेते आहेत. तीन दिवसांपूर्वीच ते दिल्लीत शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर ते अमृतसरला आले होते. अमृतसरला विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सेनानी उजागर सिंग यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता. अनेक वक्त्यांची भाषणं झाल्यानंतर दातार सिंग यांनीही खणखणीत भाषण केलं. यावेळी त्यांनी केंद्राच्या कृषी कायद्याची चिरफाड करत हा कायदा कसा शेतकरी विरोधी आहे हे दाखवून दिलं.

अन् काही काळायच्या आत…

मात्र, भाषण करत असतानाच त्यांनी अचानक अलविदा, आता माझी वेळ संपलीय, असं म्हणून भाषण थांबवलं. त्यानंतर ते खुर्चीत बसले आणि तेवढ्यात त्यांनी हृदयविकाराचा झटका आला. सिंग यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं कळल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सभेचा कार्यक्रम तात्काळ बंद करण्यात आला आणि क्षणाचा विलंबही न लावता त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी सिंग यांचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं.

नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली

अचानक झालेल्या या प्रकाराने सभेतील सर्वांनाच शॉक बसला आहे. शेतकरी नेतेही सुन्न झाले आहेत. दातार सिंग हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने होते. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

अनेक आंदोलनात भाग

शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. दातार सिंग यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. मोदी सरकार कृषी कायद्यावर तोडगा काढण्याऐवजी शेतकरी आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी एका सभेत केला होता. जोपर्यंत सरकार कृषी कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत शेतकरी घरी जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. (Punjab farmer leader Datar Singh dies of heart attack)

संबंधित बातम्या:

Delhi Violence : लाल किल्ल्यावरील हिंसाचारात सहभागी 20 जणांचे फोटो प्रसिद्ध, दिल्ली पोलिसांकडून शोधमोहीम हाती

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकऱ्यांचा ‘रेल रोको’

अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी

(Punjab farmer leader Datar Singh dies of heart attack)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.