Rafale Deal: द सॉल्ट एव्हिएशनने मध्यस्थाला दिले 65 कोटी; फ्रान्सच्या वृत्तसंस्थेचा दावा

भारतासोबत राफेलची डील (Rafale Deal) करण्यासाठी फ्रान्सची कंपनी द सॉल्ट एव्हिएशनने मध्यस्थाला 75 लाख यूरो म्हणजेच 65 कोटी रुपये दिल्याचा आरोप फ्रान्सच्या एका वृत्तसंस्थेकडून करण्यात आला आहे.

Rafale Deal: द सॉल्ट एव्हिएशनने मध्यस्थाला दिले 65 कोटी; फ्रान्सच्या वृत्तसंस्थेचा दावा
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 7:13 AM

नवी दिल्ली – भारतासोबत राफेलची डील (Rafale Deal) करण्यासाठी फ्रान्सची कंपनी द सॉल्ट एव्हिएशनने एका मध्यस्थाला 75 लाख यूरो म्हणजेच 65 कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शोध पत्रकारीता करणाऱ्या मीडियापार्ट या संस्थेने हा दावा केला आहे. तसेच हा व्यवहार करण्यासाठी बनावट बिल देखील तयार करण्यात आल्याचे मीडियापार्टने आपल्या दाव्यामध्ये म्हटले आहे. या संस्थेच्या दाव्यानुसार 2007 ते 2012  दरम्यान मॉरीशसमध्ये मध्यस्थाला पैसे देण्यात आले.

जुलैमध्येही दिली होती बातमी 

मीडियापार्टने गेल्या जुलै महिन्यात देखील राफेल कराराबाबत एक महत्त्वाची बातमी दिली होती. फ्रान्सने भारतासोबत 36 राफेल लढाऊ विमानांचा सौदा केला आहे. परंतु 59,000 कोटी रुपयांच्या या व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याच्या अंतर्गत चौकशीसाठी फ्रान्सने न्यायाधीशाची नियुक्ती केल्याचा दावा मीडियापार्टकडून करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा आरोप करण्यात आल्याने, राफेचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्याता आहे. दरम्यान मीडियापार्टच्या या दाव्याबाबत अद्याप सुरक्षा मंत्रालय आणि द सॉल्ट एव्हिएशनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

वृत्तसंस्थेने काय म्हटले? 

फान्सच्या या वृत्तपत्राकडून रविवारी हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, भारतासोबत राफेलची डील करण्यासाठी द सॉल्टएव्हिएशनने एका मध्यस्थाला तब्बल 65 कोटी रुपयांची लाच दिली. तसेच हा व्यवहार करण्यासाठी बनावट बिल देखील तयार करण्यात आले. आम्ही आज त्या बिलाची प्रत प्रसिद्ध करत आहोत. याच बनावट बिलाच्या आधारे मध्यस्थाला 75 लाख युरो म्हणजेच 65 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

भारतीय तपास यंत्रणेवर गंभीर आरोप 

मीडियापार्टकडून भारतीय तपास संस्थांवर देखील गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. भारतीय तपास संस्थांकडे ऑक्टोबर 2018 पासून या कथील व्यवाहाराचे पुरावे आहेत. मात्र तरी त्यांच्याकडून तपास करण्यात आला नाही. इडी आणि सीबीआयकडे पुरावे असून देखील त्यांनी तपास न करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे. द सॉल्ट एव्हिएशन या कंपनीकडून राफेल करारासाठी सुशेन गुप्ता या मध्यस्थाला 65 कोटी रुपये देण्यात आल्याचे मीडियापार्टने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.