महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार, राहुल गांधींचे भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
नुकताच राहुल गांधी यांची व्होट अधिकार यात्रा सुरू झाली आहे. यादरम्यान त्यांनी भाजपावर अत्यंत गंभीर आरोप केली आहेत. बिहारमधून त्यांनी भाजपाच्याविरोधात मोर्चा सुरू केलाय. या यात्रेला लोकांनी मोठी गर्दी केली आहे.

राहुल गांधी यांची व्होट अधिकार यात्रा सुरू झाली आहे. 16 दिवसांमध्ये 1,300 चा ते प्रवास करणार आहेत. त्यांनी बिहारमधून या यात्रेतून भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ही यात्रा रोहतास येथून सुरू झाली आणि पाटणा येथे संपणार आहे. 16 दिवसांत राहुल गांधी 20 जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहेत. राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात 1 कोटी नवीन मतदार तयार झाले, कर्नाटकातील एका विधानसभेत 1 लाखाहून अधिक मते चोरीला गेली आणि तिथे भाजपाचा उमेदवार निवडून आला. यावेळी निवडणूक आयोगावर त्यांनी काही गंभीर आरोप केली.
भाजपाला जे मतदान झाले ते सर्व मतदान यादीत नव्याने सहभागी झालेल्या लोकांकडून असे त्यांनी म्हटले. आम्ही याची चाैकशी सुरू केली आणि त्याचा अहवाल काढला. भाजपाला नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची मते मिळाली आणि ते निवडणूक जिंकले. आम्ही तक्रार केली आणि निवडणूक आयोगाला म्हणालो की, आम्हाला व्हिडीओ दाखवा. पण निवडणूक आयोगाने याला मनाई केली.
आम्ही सर्व रेकॉर्ड काढले आणि एका रेकॉर्डला दुसऱ्या रेकॉर्डसोबत जुळून बघितले. पुढे राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाने माझ्याकडून एफिडेविट मागितले. पूर्ण देशात विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका चोरी केल्या जात आहेत. यांची पुढची रणनीती आहे की, त्यांना बिहारच्या निवडणुकीचीही चोरी करायची आहे. SIR मुळे मतदानाचा हक्क हिरावला जात आहे.
पण आपण ही निवडणूक त्यांनी चोरी करू देणार नाहीत आणि बिहारची जनता चोरी करू देणार नाही. कारण गरीब आणि कमजोर लोकांकडे फक्त मतदान आहे आणि आम्ही मतदान चोरी करू देणार नाहीत. निवडणूक आयोग जे काही करत आहे ते संपूर्ण देशाला माहिती आहे. ही गोष्ट आता काही लपलेली नाहीये. अगोदर देशाला माहिती नसेल पण आता समजले आहे. आम्ही पत्रकार परिषदमध्ये दाखवले की, निवडणूक आयोग कशाप्रकारे चोरी करत आहे. जिथे कुठे हे चोरी करत आहेत, तिथे आपण त्यांची चोरी पकडू असे त्यांनी म्हटले.
