VIDEO: 9 सेंकदात 13 पुशअप्स… राहुल गांधींनी दाखवला फिटनेसचा दम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकांची जशी चर्चा होते तशीच त्यांच्या फिटनेसचीही नेहमीच होत असते. (Rahul Gandhi Practices Martial Art Aikido; Does Push-ups With School Students)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:05 PM, 1 Mar 2021
VIDEO: 9 सेंकदात 13 पुशअप्स... राहुल गांधींनी दाखवला फिटनेसचा दम
राहुल गांधी, काँग्रेस नेते

चेन्नई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकांची जशी चर्चा होते तशीच त्यांच्या फिटनेसचीही नेहमीच होत असते. राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून या ठिकाणीही त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली. केवळ फिटनेसची चर्चाच रंगली नाही तर राहुल यांनी अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारून आपला फिटनेसचा दमही दाखवून दिला. निमित्त होतं एका शाळेतील कार्यक्रमाचं. (Rahul Gandhi Practices Martial Art Aikido; Does Push-ups With School Students)

राहुल गांधी हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी कन्याकुमारी येथे रोड शो केला. त्यानंतर त्यांनी एका शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी गप्पा मारता मारता त्यांनी आयकिदो हा मार्शल आर्टचा प्रकार विद्यार्थ्यांना करून दाखवला. त्यानंतर मेरोलिन शेनिघा नावाच्या विद्यार्थ्यीनीने त्यांना पुशअप मारण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनीही मागे पुढे न पाहता तात्काळ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली.

व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, राहुल गांधी पुशअप्स मारताना दिसत आहेत. अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारताना ते दिसत आहेत. त्यानंतर या विद्यार्थ्यीनीने त्यांना एका हाताने पुशअप्स मारायला सांगितले. राहुल यांनी या विद्यार्थीनीची ही इच्छाही पूर्ण करत एका हाताने पुशअप्स मारले.

दक्षिणेवर लक्ष

दरम्यान, राहुल गांधी यांनी दक्षिणेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये ते वारंवार दौरा करत आहेत. पुद्दुचेरी , केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेतील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे या राज्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातही त्यांनी केरळवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे.

केरळमध्ये सिक्स अॅब्स दाखवले

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी केरळमध्ये आले होते. यावेळी ते मच्छिमारांसोबत समुद्रावर गेले होते. त्यावेळी त्यांनी मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोत होडीतून प्रवासही केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी समुद्रात उडी मारून पोहण्याचा आनंदही लुटला होता. याचवेळी राहुल यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात ते त्यांचे सिक्स अॅब्स दाखवताना दिसत आहेत. राहुल यांच्या या फिटनेसचं सोशल मीडियावरून मात्र प्रचंड कौतुक होतंय. (Rahul Gandhi Practices Martial Art Aikido; Does Push-ups With School Students)

 

संबंधित बातम्या:

प्रियांका गांधींचं ‘मिशन आसाम’; आदिवासी नृत्यावर धरला ताल

VIDEO : शरद पवार यांना कोरोना लस, पाहा व्हिडीओ

गेल्यावर्षी मुंबई अंधारात का गेली? कुणी घातली? कोडं उलगडलं, न्यूयॉर्क टाईम्सचं सविस्तर वृत्त

(Rahul Gandhi Practices Martial Art Aikido; Does Push-ups With School Students)