Rahul Gandhi: मोदीजी… या आवाजासमोर उभे राहू नका, राहुल गांधी यांचा तो बेधडक सल्ला, पोलिसांना मोठा इशारा
Rahul Gandhi on Narendra Modi-Amit Shah: पोलिसांनी अमानुष मारहाण केली आणि अश्लाघ्य शिवीगाळ केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी माध्यमांसमोर केला. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी पोलिसांचा नाझींसारखा वापर करण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी राहुल गांधी यांनी पोलिसांचे कान टोचले. पण सत्ताधाऱ्यांनाही मोठा इशारा दिला.

Rahul Gandhi Warning to Delhi Police: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन सुरू आहे. काँग्रेससह सीजेपीच्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील काही विद्यार्थी आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात समोर आले आणि त्यांनी आपबित्ती सांगितली. त्यात तीन मुलींनी आणि तीन मुलांनी त्यांच्यावर कसा अत्याचार करण्यात आला. त्यांना कशी अमानुष मारहाण करण्यात आली, याचा पाढा वाचला. पोलिसांनी अत्यंत अश्लाघ्य शिवीगाळ केली. गुप्तजागेवर मारहाण केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांना मोठा इशारा दिला.
या आवाजासमोर उभे राहू नका
मी माझ्या पत्रकार परिषदेत अगोदरच सांगितल आहे की, हा हिंदुस्थान आहे. अमित शाहजी तुम्ही हे चांगल्या प्रकारे पाहा. इथं कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लीम नाही. कोणी शिख नाही. कोणी कोणत्या जातीचं नाही आहे. कोणी पुरूष नाही, कोणी स्त्री नाही. एक आवाज आहे, एक आंदोलन आहे. एकच आवाज आहे. तुम्ही या आवाजासमोर उभे आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या आवाजसमोर उभे आहेत. मी तुम्हाला सुचवितो की या आवाजासमोर उभे राहू नका. या आवाजासमोर कोणीच उभं ठाकू शकत नाही, असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांचा पोलिसांना खणखणीत इशारा
जे पोलीस आहेत. त्यांना मी प्रेमानं सांगू इच्छितो की, मनातून सांगू इच्छितो की, मी या सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच सांगितले आहे की, त्यांनी या सर्व मारहाणीचे व्हिडिओ शूट करावे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की, तुम्ही व्हिडिओ तयार करा. पुरावा जवळ ठेवा. असे पुरावे आमच्याकडे सुद्धा आहेत. जेव्हा हे सर्व प्रकरण संपेल. तेव्हा या पुराव्याचा आम्ही वापर करू. ज्याला शिक्षा द्यायची त्याला देऊ. सर्वांना शिक्षा होईल. ज्ञानेश कुमारांपासून सर्वांना शिक्षा होईल. वरपासून ते खालपर्यंत सर्वांना शिक्षा होईल. नरेंद्र मोदी, ज्ञानेश कुमार, अमित शाह जे पोलीस शिपाई या विद्यार्थ्यांवर हात उचलतील, त्यांचा पुरावा आमच्याकडे आहेत. घाबरू नका, लव्ह यू, थँक यू, असे राहुल गांधी म्हणाले.