AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींपुढे अखेर पोलीस झुकले, 31 दिवसानंतर एफआयआर नोंदवण्यास सुरुवात; साहिलला न्याय मिळणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पॅलेट गनच्या वापराच्या चौकशीसाठी भेट दिली. त्यांनी पॅलेट गन पीडित साहिल लोहबच याला सोबत घेऊन याप्रकरणात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी ठोस माहिती दिली नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राहुल गांधींपुढे अखेर पोलीस झुकले, 31 दिवसानंतर एफआयआर नोंदवण्यास सुरुवात; साहिलला न्याय मिळणार?
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2026 | 5:59 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी आज संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण कुठवर आलं याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी पोलीस ठाण्यात आले. यावेळी राहुल गांधी हे पॅलेट गन पीडित साहिल लोहबच यालाही घेऊन पोलीस ठाण्यात गेले. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिल्याने राहुल गांधी यांनी चार तास पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे अखेर पोलीस झुकले आहे. पोलिसांनी 31 दिवसानंतर एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी पॅलेट गनचा वापर करण्यात आला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याची माहिती घेण्यासाठीच राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात आले. जाताना पॅलेट गन पीडित तरुणालाही घेऊन आले. तब्बल अर्धा तास राहुल गांधी पोलीस ठाण्यात होते. यावेळी त्यांनी एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका. त्यांची तक्रार दाखल करून घ्या. एफआयआर दाखल करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी पोलिसांना केली.

तपास कुठपर्यंत आला?

पोलिसांकडून पॅलेट गन कारवाईची कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे नेमका तपास कुठपर्यंत आलाय हे कळायला मार्ग नसल्याने राहुल गांधी ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अर्धा तास पोलीस ठाण्यात राहिल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राहुल गांधी यांनी थेट पोलिस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. राहुल गांधी यांच्यासोबत पीडित तरुणही ठिय्या आंदोलन करत आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या बाहेरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी जमली आहे.

सर्वोच्च न्यायालयाची समिती

दरम्यान, सर्वोच्च न्यायालायनेही जंतमंतरवरील आंदोलनाची दखल घेतली आहे. पॅलेट गन कारवाईची चौकशी करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालायने सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीत सीबीआयच्या माजी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कशा कशाचा तपास करायचा याची गाईडलाईनही कोर्टाने आखून दिली आहे. तसेच हा तपास निष्पक्षपाती करण्याचे निर्देश दिले आहेत.

या समितीला कोर्टाने काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. जंतरमंतरवरील आंदोलनात तरुणींवर झालेल्या हल्ल्याबाबत आणि त्यांच्या शोषणाबाबतचा अहवाल सर्वात आधी देण्यास सांगितलं आहे. तसेच आंदोलकांना म्हणणं मांडण्यासाठी ओळख लपवून तक्रारी देण्याचं आवाहनही कोर्टाने केलं आहे.

अखेर पोलीस झुकले

राहुल गांधी यांनी दुपारपासूनच पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. तब्बल चार तास राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेर बसून होते. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही बसून होत्या. साहिलसह त्याचे आईवडील आणि त्याची वकीलही पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत होते. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतल्याने पेच निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर पोलिसांना माघार घ्यावी लागली. तब्बल 31 दिवसानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास सुरुवात केली आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?