राहुल गांधींचा ट्विटर धमाका, एका दिवसात अनेक नेते, पत्रकारांना केलं अनफॉलो

राहुल गांधींचा ट्विटर धमाका, एका दिवसात अनेक नेते, पत्रकारांना केलं अनफॉलो
rahul gandhi

रोज ट्विट करून भाजपला घेरणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. मंगळवारी त्यांनी दिवसभरात अनेक नेते आणि पत्रकारांना ट्विटरवरून अनफॉलो केलं आहे. (Rahul Gandhi unfollows many people on twitter)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jun 02, 2021 | 4:09 PM

नवी दिल्ली: रोज ट्विट करून भाजपला घेरणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. मंगळवारी त्यांनी दिवसभरात अनेक नेते आणि पत्रकारांना ट्विटरवरून अनफॉलो केलं आहे. त्यात काँग्रेसचे नेते आणि काही जवळच्या पत्रकारांचाही समावेश आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ट्विटरवरून नेते आणि पत्रकारांना अनफॉलो करण्यामागच्या राहुल यांच्या या खेळीवर राजकीय विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. (Rahul Gandhi unfollows many people on twitter)

राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाउंटवरून मंगळवारी अनेकांना अनफॉलो केलं गेलं. त्यात काँग्रेस नेत्यांचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर वायनाड येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात काम करणाऱ्यांनाही अनफॉलो केलं गेलं. त्यामुळे राजकीय वर्तुळापासून ते सोशल मीडियापर्यंत एकच चर्चा सुरू झाली. मात्र, राहुल गांधी यांचं अकाउंट रिफ्रेश केलं जात आहे. त्यासाठी ही एक्सरसाईज असून लवकरच काही लोकांची यादी तयार केली जाणार आहे, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. नव्या लिस्टमधील लोकांना राहुल गांधी फॉलो करतील. तसेच ज्या लोकांना अनफॉलो करण्यात आलं आहे, त्यापैकी काही लोकांना पुन्हा फॉलो केलं जाणार असल्याचंही काँग्रेसने स्पष्ट केलं.

तर्कवितर्कांना उधाण

दरम्यान, राहुल गांधी यांनी अनेक लोकांना अनफॉलो केल्याने त्यावर चर्चा सुरू झाली. त्यावर अनेकजण वेगवेगळे निष्कर्ष काढायला लागले. ट्विटरवरून अनेकांना अनफॉलो करण्यामागे राहुल गांधी यांची काही योजना आहे का? असा सवालही करण्यात आला. मात्र, काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीने ही चर्चा मंदावली.

राजकीय रणनीतीचा भाग?

काँग्रेसकडून खुलासा करण्यात आला असला तरी अजूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. या कृतीला राहुल गांधी यांच्या भविष्यातील रणनीतीचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी हे ट्विटरवर आक्रमक आहेत. कोरोना काळात त्यांनी ट्विटरवरूनच सरकारवर निशाणा साधला आहे. तर विरोधकांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी कोविडला मोविड म्हटलं आणि मोदींवर थेट निशाणा साधला. तेव्हा त्यांचं ट्विटर अकाउंट वादात आलं होतं. ट्विटमधील भाषेवर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला होता. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येण्यास केवळ मोदी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोविडला मोविड नाव देण्यात आल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं. (Rahul Gandhi unfollows many people on twitter)

संबंधित बातम्या:

गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर लिखाणासाठी परवानगी बंधनकारक; केंद्राचा नवा नियम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या; चांगल्या नोकरीसाठी आता वर्षभर वाट पाहा

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, कोरोनाबळींचे आकडे 400 ने वाढले

(Rahul Gandhi unfollows many people on twitter)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें