AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वीच थेट रेल्वे गाड्या रद्द, दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या..

कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन आहे. त्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील या आंदोलनाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीपेजीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठी घोषणा केली.

मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वीच थेट रेल्वे गाड्या रद्द, दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या..
Cockroach Janata Party
| Updated on: Oct 09, 2026 | 11:30 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन आहे. उद्या ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आंदोलन करत आहे. मात्र, त्यापूर्वीच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत तर आता रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला. दिल्लीती उद्या होणाऱ्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. उद्या नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकात पोहोचणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी जंतर मंतरवर दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थी मोठ्या संख्येने जंतर मंतरवर पोहोचले होते. यासोबतच जंतर मंतरच्या बाहेरही विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. संसद परिसरात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला.

विद्यार्थ्यांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढला. ज्यावेळी सुरक्षेचा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झाला. कॉकरोच जनता पार्टीच आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उद्यापासून दिल्लीत आंदोलन करत आहे. अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानेश कुमार यांच्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने दिल्लीत येण्याचे आवाहन केले. त्याच पार्श्वभूमीवर आता मोठा निर्णय घेतला.

दुसरीकडे इंडिया आघाडीचेही आंदोलन दिल्लीत सुरू आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आक्रमक भूमिका घेताना दिसले. इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच खासदार या मोर्चात सहभागी होते. आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी दोननंतर त्यांच्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या 10 ऑक्टोबर पहाटे 4:00 ते दुपारी 2:00 या वेळेत नवी दिल्ली किंवा हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या.

प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी यानुसार प्रवासाच नियोजन करावे अशी रेल्वे प्रशासनाची विनंती केली. विद्यार्थी मोठ्या संख्येने दिल्लीत पोहोचू नयेत, यामुळे हा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे कळतंय. दिल्लीतील उद्याच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करताना यापूर्वी अनेकदा अभिजीत दिपके दिसले. त्यातच आता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...