Rajasthan Cabinet Reshuffle: समर्थकांच्या घोषणाबाजीत आमदारांचा शपथविधी, राजस्थानमध्ये गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल

राजस्थान सरकारच्या सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामे दिल्यानंतर आज राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येत आहे. आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. 11 आमदारांना कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जात आहे.

Rajasthan Cabinet Reshuffle: समर्थकांच्या घोषणाबाजीत आमदारांचा शपथविधी, राजस्थानमध्ये गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल
Rajasthan Cabinet Reshuffle
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 5:13 PM

जयपूरः राजस्थान सरकारच्या सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामे दिल्यानंतर आज राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येत आहे. आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. 11 आमदारांना कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जात आहे. शपथविधी पूर्वी सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता सर्व काही ठीक आहे आणि संपूर्ण पक्ष एक आहे. मात्र याच दरम्यान काही आमदारांच्या नाराजीची बाबही समोर येत आहे.

सचिन पायलट यांनी मंत्र्यांच्या नव्या यादीचे कौतुक केले असले तरी या यादीवर सगळेच खूश नाहीत. आमदार जोहरीलाल मीणा यांनी रविवारी सांगितले की, विधानसभेतील सर्वात भ्रष्ट सदस्याला अलवर जिल्ह्यातील मंत्री करण्यात आले आहे. ते काँग्रेस नेते टिकाराम जूली यांच्याबद्दल बोलत होते, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. अलवर जिल्ह्यासाठी आजचा काळा दिवस आहे, गरज पडल्यास मी राजीनामा देईन, असे जोहरीलाल मीना यांनी सांगितले.

काँग्रेसचे आमदार बाबूलाल बैरवा यांनीही नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेवर नाराजी व्यक्त केली. जोहरीलाल मीना, शाफिया झुबेर आणि बसपा आमदार दीपचंद खाडिया यांनीही अलवर जिल्ह्यातील टिकाराम जुली यांना कॅबिनेट मंत्री बनवल्याबद्दल नाराजी व्यक्त केले.

दरम्यान, राजस्थानमध्ये नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्री झालेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले, आज राजस्थान सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन. गेल्या 35 महिन्यांत आपल्या सरकारने राज्याला संवेदनशील, पारदर्शक आणि उत्तरदायी सुशासन देण्याचे काम केले आहे. सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या सरकारने राज्याला विकासाच्या वाटेवर नेले आहे.

दरम्यान, विरोधकांंनी राजस्थानमधल्या नवीन मंत्रिमंडळावर टोलेबाजी केली. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे 15 पैकी फक्त 3 मंत्री महिला आहेत, म्हणजे 20 टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये जिथे चौथ्या क्रमांकावर आहे तिथे 40 टक्के तिकीट देण्याचे खोटे आश्वासन देत आहे. प्रियांका गांधींच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये 40  टक्के तिकिटे महिलांना देण्याची घोषणेबद्दल ते बोलत होते.

सचिन पायलट आज सकाळी म्हणाले होते की, त्यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची विचारसरणी पुढे आणली असून या विचारसरणीनुसार तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एससी आणि एसटी मंत्रीही करण्यात आले आहेत. काँग्रेसने राजस्थानात पंजाबचा फॉर्म्युला वापरल्याचं सांगितलं जात आहे. कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच चार अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जुली आणि गोविंद मेघवाल या चार दलित नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही अपक्ष आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

हे ही वाचा

Rajastan Cabinet Reshuffle: आमच्या पक्षात दुफळी नाही, नेतृत्वाने योग्य पाऊलं घेतली, दलित चेहऱ्यांनाही जागा- सचिन पायलट

हिवाळी अधिवेशनापुर्वी ममता बॅनर्जी 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी, अमित शहा, वरुण गांधींसह अनेकांशी घेणार भेटी

UP Elections 2022: योगींनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो, कोणत्या विषयावर चर्चा? चर्चांना उधाण

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.