AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दार मुख्यमंत्री आम्हाला नकोच…; गद्दारी नाट्याचा या राज्यातही गदारोळ

राजस्थानमध्ये रविवारी रात्रीपासून राजकीय पेच कायम आहे. सरकार वाचवणे काँग्रेससाठी आव्हान बनले आहे.

गद्दार मुख्यमंत्री आम्हाला नकोच...; गद्दारी नाट्याचा या राज्यातही गदारोळ
| Updated on: Sep 26, 2022 | 9:53 PM
Share

नवी दिल्लीः राजस्थानातील राजकीय घडामोडींनी आता दिल्लीच्या राजकारणातही प्रचंड गदारोळ माजला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेहलोत (CM Ashok Gehlot) सरकारच्या नगरविकास मंत्री शांती धारिवाल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शांती धारिवाल यांनी सचिन पायलट यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत गद्दारांना जर पक्ष मोठी पदं देत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यावर टीका करत असतानाच त्यांनी जयपूरला पोहोचलेले काँग्रेसचे पर्यवेक्षक अजय माकन यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

धारिवाल यांनी सचिन पायलट यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी काँग्रेसन प्रयत्न केले आहेत, मात्र पायलट यांनी आमदारांबरोबर पक्षपाती करुन पक्षाशी गद्दारी केली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.

मंत्री शांती धारीवाल यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेत अजय माकन यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस यांनीही काँग्रेसचे नेते बंडखोरांना मुख्यमंत्री करण्यासाठी आले होते का असाही सवाल त्यांनी केला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना धारीवाल म्हणाले की, आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता आहे. आणि पक्षासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहे.

त्यामुळे अशा गद्दारांना पक्षाकडून जर मोठी पदं मानानं देत असेल तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असाही सज्जड दम त्यांनी दिला आहे.

शांती धारिवाल म्हणाल्या की, 2020 मध्ये राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर संकट आले होते. त्यावेळची आठवण सांगत त्यांनी सोनिया गांधींची आठवण सांगितली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सरकार वाचवयाचे आहे.

मात्र तरीही त्यांच्या सुचनांकडे पायलट यांनी दुर्लक्ष केले होते. सचिन पायलट उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी बंडखोरी केली होती.

सचिन पायलट यांच्यावर आरोप करत असतानाच धारिवाल यांनी कट अजय माकन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे. माकन यांना अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठीच हा खटाटोप केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राजस्थानमध्ये रविवारी रात्रीपासून राजकीय पेच कायम आहे. सरकार वाचवणे काँग्रेससाठी आव्हान बनले आहे. गेहलोत गटाच्या आमदारांनी आपले राजीनामे सभापतींकडेही दिले आहेत.

सचिन पायलट यांना सीएम पदावर बसवणं हे आम्ही खपवून घेणार नाही. कारण सचिन पायलट यांनी सरकार पाडण्याचा, काँग्रेसशी गद्दारी केली आहे.

त्या व्यक्तीला आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही. त्याबरोबरच ज्यानी आमदारांना हॉटेलमध्ये बसवले होते, त्यालाच तुम्ही मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा करत आहात आणि आम्ही ते खपवून घेणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.