Crocodile on Rail Track : रेल्वे ट्रॅकवर जखमी मगर, सुसाट राजधानी एक्स्प्रेस तब्बल 25 मिनिटं थांबली!

राजधानी एक्स्प्रेस ( Rajdhani Express ) 25 मिनिटं थांबवल्यानंतरही प्रवाशांनी अजिबात गोंधळ केला नाही. आणि याला कारणं होती एक मगर. ( injured crocodile  ) मुंबई-वडोदरा रेल्वे ट्रॅकवर ( Mumbai-Vadodara railway line) ही मगर जखमी अवस्थेत होती

Crocodile on Rail Track : रेल्वे ट्रॅकवर जखमी मगर, सुसाट राजधानी एक्स्प्रेस तब्बल 25 मिनिटं थांबली!
Crocodile on Rail Track

वडोदरा: बऱ्याचदा ट्रेनला ( Indian Railway ) उशीर होतो किंवा काही ना काही तांत्रिक कारणाने रेल्वेगाड्या रुळावरच थांबवल्या जातात. या सगळ्यात प्रवाशांची नाराजी रेल्वे प्रशासनाला सहन करावी लागते. मात्र, मंगळवारी राजधानी एक्स्प्रेस ( Rajdhani Express ) 25 मिनिटं थांबवल्यानंतरही प्रवाशांनी अजिबात गोंधळ केला नाही. आणि याला कारणं होती एक मगर. ( injured crocodile  ) मुंबई-वडोदरा रेल्वे ट्रॅकवर ( Mumbai-Vadodara railway line) ही मगर जखमी अवस्थेत होती आणि या मगरीला रेस्क्यु करण्यासाठी राजधानी एक्स्प्रेस 25 मिनिटांसाठी थांबवण्यात आली. ( Rajdhani Express stopped for 25 minutes to rescue an injured crocodile lying on the Mumbai-Vadodara railway line )

घटना नेमकी कशी घडली?

वडोदऱ्यापासून काहीच अंतरावर मियागाम कर्जन जक्शन आहे. या जंक्शनपासून 5 किलोमीटरवर एक मगर रेल्वेट्रॅकवर जखमी अवस्थेत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. यानंतर रेल्वे प्रशासनाने वनविभागाला याबाबत माहिती दिली. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि वनविभागाचे कर्मचारी चालत या मगरीपर्यंत पोहचले. घटनास्थळी पोहचल्यावर मगर अतिशय गंभीर अवस्थेत असल्याचं त्यांना दिसलं. मगरीच्या तोंडाला आणि डोक्याला मार लागला होता. यानंतर मगरीला याठिकाणाहून हलवण्याचे प्रयत्न सुरु झाले

आणि राजधानी एक्स्प्रेसला 25 मिनिटं थांबवलं!

मगरीचं रेस्क्यु ऑपरेशन सुरु असतानाच राजधानी एक्स्प्रेस या मार्गावरुन जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाला कळालं. त्यांनंतर काहीच वेळात राजधानी एक्स्प्रेस तिथं पोहचली, पण या गाडीला थांबवण्यात आलं. तब्बल 8 फूटांची आणि शेकडो किलो वजनाची ही मगर होती. तिला जागेवरुन हलवणं अवघड होतं. मगरीला वाचवण्याचे वनविभागाने प्रयत्न सुरु केले. त्यावेळी मगर काहीसा जबडा उघडत होती.

जखमी मगरीने अखेर प्राण सोडले

मगरीला वाचवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीप्रेमींनी जिवाची शर्थ केली, पण मगर गंभीर जखमी झाली होती. आधी गेलेल्या कुठल्यातरी रेल्वेगाडीने तिला जखमी केलं होतं. डोक्यावर आणि तोंडाला मोठी जखम होती. त्यामुळे काहीच वेळात या मगरीने प्राण सोडले. यानंतर या मगरीला किसान ट्रेनमध्ये टाकून कर्जन जंक्शनवर आणण्यात आलं आणि मगरीचा मृतदेह वनविभागाकडे सुपुर्द करण्यात आला. मगरीला रेल्वे रुळावरुन हलवण्यानंतर राजधानी एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. मात्र, घटनेची माहिती मिळाल्याने, 25 मिनिटं थांबूनही कुठल्याही प्रवाशाने तक्रार केली नाही.

याच भागातून आणखी 3 मगरींना रेस्क्यु केलं

ज्या भागात ही मगर आढळली, त्यापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी प्राणीप्रेमींनी 3 मगरींना रेस्क्यु केलं. तरसाली गावाजवळ 4 फूटांच्या मगरीला वाचवण्यात आलं, गावकऱ्यांमध्ये या मगरीची मोठी दहशत निर्माण झाली होती. तर दुसरीकडे एमएम विद्यापीठाजवळही एक मगर असल्याची माहिती प्राणीप्रेमींना मिळाली होती. ही मगर 3 ते 4 फुटांची होती, तिलाही रेस्क्यु करण्यात आलं. तर कोटंबी या गावातून 5 फुटांच्या मगरीला प्राणीप्रेमींनी वाचवलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI