AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन, सोबत आणली ही खास भेटवस्तू

Ram Mandir : नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आज अयोध्येत दाखल झाल्यानंतर रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी ते सरयु आरतीत देखील सहभागी होणार आहेत. राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो लोकं अयोध्येत दाखल होत आहे. यामध्ये आता नेपाळचे परराष्ट्र मंत्री देखील पोहोचले आहेत.

Ram Mandir : नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन, सोबत आणली ही खास भेटवस्तू
| Updated on: Feb 24, 2024 | 6:45 PM
Share

Ram mandir : 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले होते. तेव्हापासून दररोज हजारो लोकं अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत. भारतातूनच नाही तर परदेशातून देखील लोकं दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आता नेपाळचे परराष्ट्र मंत्री एन.पी. सौद यांनी देखील आज अयोध्येत प्रभू रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यांनी पाच चंद्रभूषण देखील सोबत आणले आहेत जे ते रामलल्ला यांना समर्पित करणार आहेत. रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी ते गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. परराष्ट्र मंत्री सौद आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले.

राम मंदिरात विशेष पूजा

नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांचे अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. विमानतळावरून ते थेट श्री रामजन्मभूमी मंदिराकडे रवाना झाले. नेपाळचे परराष्ट्र मंत्री त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना सौद यांच्यासोबत दर्शनाला आले होते. अयोध्येला पोहोचल्यानंतर नेपाळचे परराष्ट्र मंत्री यांनी राम मंदिरात विशेष पूजा केली.

सरयू तीरावर सायंकाळच्या आरतीत सहभागी होणार

नेपाळचे परराष्ट्र मंत्री सौद यांनी रामलल्लाला पाच प्रकारचे चांदीचे दागिने अर्पण केले. यामध्ये धनुष्य, गदा, गलाहार, हात आणि पायात घातण्यासाठी बांगड्या इत्यादींचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सौद हे नेपाळ सरकारचे पहिले मंत्री असतील जे अयोध्येला भेट देणार आहेत. रामलल्लाच्या दर्शनानंतर नेपाळचे परराष्ट्र मंत्री सरयूच्या काठावर होणाऱ्या संध्याकाळच्या आरतीमध्ये सहभागी होणार आहेत. हनुमानगढी मंदिराला भेट देण्यासोबतच ते तेथील इतर ठिकाणांनाही भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी देशभरातील जवळपास सात हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर लगेचच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी रामल्लाचे दर्शन घेतले असून करोडो रुपयांचे दान आले आहे.

राम मंदिरात चार मोठ्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या हुंडीमध्ये लोकं दान देत आहेत. या शिवाय देणगी देण्यासाठी काऊंटर देखील या ठिकाणी सुरु करण्यात आले आहेत.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.