Ramnavmi 2024 : प्राण प्रतिष्ठेनंतर रामनवमीचा उत्साह; लाखो भाविकांनी अयोध्या गेली फुलून

प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत लाखो भाविकांची एकच गर्दी झाली आहे. या वर्षी प्राण प्रतिष्ठेनंतर पहिल्याच रामनवमीला अभूतपूर्व उत्साह आहे. देशातूनच नाही तर परदेशातून पण अनेक भाविक हा सोहळा याचि देही साठविण्यासाठी रामनगरीत दाखल झाले आहेत.

Ramnavmi 2024 : प्राण प्रतिष्ठेनंतर रामनवमीचा उत्साह; लाखो भाविकांनी अयोध्या गेली फुलून
रामनवमीला भाविकांची मांदियाळी
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 9:05 AM

अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभू श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनमवी आहे. या पहिल्या रामनमवीच्या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्तं दर्शनासाठी दाखल झालेत. अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान गडी आणि राम मंदिर परीसर भाविकांनी फुलून गेले आहेत. अयोध्येतील ही संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्या शहरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या शहराबाहेरच सर्व वाहने थांबवून सर्व भाविकांना चालतच मंदिरात दर्शनासाठी जावं लागत आहे. तसेच भाविकांची गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत.

२५ लाखांहून अधिक भाविक

आज राम नमवीच्या दिवशी २५ लाखांहून अधिक भाविक राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.भारतभूमीला जर खर्‍या अर्थाने कशाने जोडले असेल, तर ते म्हणजे सनातन संस़्कृतीने! या संस्कृतीची ओेळख म्हणजेच प्रभू श्रीराम होय. प्रत्येक भारतीयाला आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाण्याची मनोमन इच्छा असते आणि हेच कारण आहे की प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत रामभक्तांची रिघ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

रामनगरी फुलांनी सजली

  • ही रामनवमी एकदम खास आहे. देशात पहिल्यांदाच 5 वर्षांच्या रामलल्लांसोबत रामनवमी साजरी करण्यात येत आहे. रामजन्मभूमी रस्ता ते गर्भगृहापर्यंत फुलांच्या माळांची सुरेख सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसर फुलांनी बहरुन गेला आहे. तर रात्रीच्या वेळी चंद्र प्रकाशात लायटिंग हा परिसर उजळून टाकणार आहे. दिव्यांची आरस होणर आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी लाखो भविकांची एकच गर्दी उसळली आहे.
  • या वेळी राम मंदिर परिसरात प्रसिद्ध कलाकार गीत, संगीत आणि भजन सादर करतील. हा परिसर भक्तीरसाने भरुन जाणार आहे. सकाळी 4 वाजेपासूनच भक्तांना रामल्लांचे दर्शन सुरु झाले आहे. रात्री 11 वाजेपर्यंत भक्त डोळे भरुन रामलल्ला बघू शकतील.

थोड्याच वेळात सूर्य टिळा?

रामनवमीला आज दुपारी 12 वाजता रामलल्लाल सूर्य टिळा लावण्यात येणार आहे. हा काळ अभिजीत मुहूर्त असल्याचे सांगण्यात येते. वाल्मिकी रामायणानुसार त्रेतायुगात याचवेळी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता. शास्त्रज्ञ रामलल्लाच्या डोक्यावर सूर्याची किरणे पोहचवण्याची व्यवस्था करतील. सूर्याची किरणे जवळपास 4 मिनिटांपर्यंत रामलल्लाच्या कपाळाची शोभा वाढवतील.

Non Stop LIVE Update
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल.