अन् तो आनंदाचा क्षण येऊन धडकणार, 41 मजूरांची सूटका होणार

Uttarakhand Rescue Operation | अखेर तो आनंदाचा क्षण जवळ येऊन ठेपला आहे. गेल्या 15 दिवसांपासून एका सुरुंगात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा आनंदाचा क्षण अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सरकारने सर्व यंत्रणा तैनात ठेवल्या आहेत. तात्पुरते रुग्णालय तयार आहे. मजुरांना एअरलिफ्टसाठी चिनूक हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहे. आता हा संघर्ष काही काळानंतर संपलेला असेल.

अन् तो आनंदाचा क्षण येऊन धडकणार, 41 मजूरांची सूटका होणार
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 6:31 PM

सिल्कयारा सुरुंग, उत्तरकाशी, | 28 नोव्हेंबर 2023 : देशासह जगाचे लक्ष लागलेला तो क्षण लवकरच येऊन ठेपणार आहे. 41 मजूरांची बोगद्यातून सुखरुप सुटका होईल. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा सुरुंग दुर्घटनेत 41 मजूर फसले आहेत. 13 नोव्हेंबर रोजी हा प्रकार समोर आला होता. गेल्या 15 दिवसांपासून या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आता हे मजूर काही तासातच बाहेर पडतील. त्यांना बाहेर पडल्यानंतर वैद्यकीय सेवा आणि अन्य सेवांचा जलद पुरविण्याची तजवीज करण्यात आली आहे. त्यासाठी चिनूक हे हेलिकॉप्टर पण तैनात ठेवण्यात आले आहे. गरज पडल्यास मजुरांना तात्काळ एअरलिफ्ट करुन हवाई मार्गाने रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

व्हर्टिकल ड्रिलिंग

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी परदेशातील ऑगर ड्रिलिंगचा वापर करण्यात आला. पण त्यात अपयश आले. त्यानंतर व्हर्टिकल ड्रिलिंगचा प्रयोग करण्यात आला. सिल्कयारा बोगद्याच्या वरील टेकडीवर उभ्या ड्रिलिंगला सुरुवात करण्यात आली होती.

बांधकामाधीन बोगद्याचा भाग कोसळला

उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्प सुरु आहे. त्यातंर्गत सिल्कयारा ते बारकोट या दरम्यान 5 किलोमीटरच्या बोगद्याचे बांधकाम सुरु आहे. बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर रोजी कोसळला होता. बोगद्याच्या सिल्कयारच्या दिशेकडील 60 मीटरचा भाग खचला होता. त्यात 41 मजूर अडकले. बोगदा बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर बोगद्यात ही माणसं अडकली. त्यांना अन्नासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.