Knowledge : भारतातील एकमेव राज्ये, जिथे कधीच दंगल झाली नाही; नाव ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल
भारतात अनेक सामाजिक आणि धार्मिक तणाव असतानाही, लक्षद्वीप आणि सिक्कीम ही एकमेव राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कधीही दंगल झाली नाही. मर्यादित लोकसंख्या, सामाजिक सलोखा, प्रभावी प्रशासन आणि शिक्षण व विकासावर भर यामुळे ही राज्ये शांतता आणि ऐक्याचे आदर्श उदाहरण बनली आहेत. देशासाठी ही ठिकाणे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत.

Riot Free State : भारत हा आशिया खंडातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक देश आहे. आपल्या देशात विविधतेत एकता आहे. त्यामुळेच देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात कशावरून तरी कुरबुरी सुरू असतात. निवडणुकीच्या राजकारणामुळे तर या कुरबुरी अधिकच वाढलेल्या असतात. त्यामुळे देशातील कोणता तरी एक कोपरा नेहमीच जळत असतो. नेहमीच कोणत्या ना कोणत्या भागात काही तरी घडत असतं. पण देशात असं एक राज्य आहे, त्या ठिकाणी कधीच दंगल झालेली नाही. दंगल मुक्त राज्य म्हणून या राज्याची देशाची ओळख आहे. देशवासियांना अभिमान वाटावा असंच हे राज्य आहे.
भारताने अनेक दशकांपासून अनेक धार्मिक आणि सामाजिक तणाव पाहिले आहेत. कधी मोठ्या दंगली घडताना पाहिल्या तर कधी छोटे छोटे संघर्षही पाहिले. कधी पोलिसांनी या दंगली आवरल्या तर कधी आर्मीलाही बोलवावं लागलं आहे. राजकीय कारणामुळे बहुतेक ठिकाणी दंगली झालेल्या आहेत. पण सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप देशातील असं एकमेव राज्य आहे की जिथे कधीच दंगली झाल्या नाही. या ठिकाणी नेहमीच सामाजिक सलोखा कायम राहिला आहे.
लोकसंख्या मर्यादित…
लक्षद्वीप हा देशातील सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. या राज्याची लोकसंख्या एक लाखही नाही. केवळ 70 हजार लोक या राज्यात राहतात. त्यामुळेच या राज्यातील नागरिकांमध्ये अतूट नातं आहे. कमी लोकसंख्या असल्यामुळेही या राज्यात अत्यंत शांतता आहे.
विविध जाती तरीही…
सिक्कीमची लोकसंख्याही कमी आहे. या दोन्ही राज्यात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. पण या दोन्ही राज्यात धार्मिक आणि जातीय सलोखा कायम राहिला आहे. देशासाठी ही दोन्ही राज्य म्हणजे आदर्श उदाहरण आहेत. सिक्कीममध्ये नेपाळी, लेप्चा आणि भूटिया समुदायाची संख्या अधिक आहे. या प्रत्येक समुदायाची संस्कृती भिन्न आहे. पण सर्वचजण एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात.
म्हणून शांतता
कोणत्याही राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असते. त्या राज्यातील प्रशासान प्रभावी असलं पाहिजे. लक्षद्वीपचं प्रशासन तक्रारीचं तात्काळ निवारण करत असतं. तर सिक्कीममध्ये शिक्षण आणि समान विकासावर भर देण्यात आला आहे. त्यामुळेच या दोन्ही राज्यातील सलोखा कायम राहिला आहे.
मासेमारी, नारळाची शेती आणि…
या दोन्ही राज्यात शांतता असल्यामुळे दोन्ही राज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. लक्षद्वीपमध्ये मासेमारी आणि नारळाची शेती केली जाते. तसेच पर्यटनातूनही राज्याला मोठी मिळत होते. तर सिक्कीमची अर्थव्यवस्थाच मुळी पर्यटनावर आधारीत आहे. जैविक खेतीवरही सिक्कीममध्ये भर दिला जातो. दोन्ही राज्यात शिक्षणावरही अधिक जोर देण्यात आला आहे.
