AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना पुन्हा पसरतोय, एका आठवड्यात भारतात इतके रुग्ण; सरकारने काय म्हटलंय?

पुन्हा एकदा देशावर कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच हळू हळू ही रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता सरकारही अलर्टमोडवर आलं आहे. काल म्हणजे 19 मे पर्यंत नक्की किती रुग्ण आढळले आहेत ते जाणून घेऊयात.

कोरोना पुन्हा पसरतोय, एका आठवड्यात भारतात इतके रुग्ण; सरकारने काय म्हटलंय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2025 | 5:04 PM
Share

पुन्हा एकदा देशावर कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं दिसत आहे. नुकताच अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही कोरोनाची लागन झाल्याचं समोर आलं. तसेच हळू हळू रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसत आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक 

सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांमध्ये, भारतातही चिंता वाढली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. देशातील विविध आरोग्य संस्थांच्या तज्ज्ञांसह अधिकाऱ्यांच्या या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशियाई देशांमध्ये वाढत्या प्रकरणांमुळे भारत सरकार सतर्क झाले आहे, या बैठकीत नक्की काय सांगण्यात आलं आहे ते जाणून घेऊयात.

19 मे 2025 पर्यंत भारतात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?

सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ज्ञ उपस्थित होते. भारतातील कोविड-19 ची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे असा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, “19 मे 2025 पर्यंत, भारतात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 257 आहे.

देशाच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता हा आकडा खूपच कमी आहे. यातील जवळजवळ सर्व रुग्ण फार गंभीर नाहीत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचीही आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. तथापि, आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार मात्र अलर्टवर आलं असून तयारी मात्र करून ठेवत आहे.

नवीन प्रकार आहे का? 

कोविड-19 च्या नवीन प्रकारामुळे आशियातील अनेक देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिकडच्या प्रकरणांमध्ये वाढ प्रामुख्याने JN.1 प्रकारामुळे झाली आहे, जो ओमिक्रॉन BA.2.86 प्रकाराचा एक नवीन प्रकार आहे . जागतिक आरोग्य संघटनेनुसार, JN.1 प्रकारात सुमारे 30 उत्परिवर्तने आहेत आणि त्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे LF.7 आणि NB.1.8.

गेल्या आठवड्यात भारतात किती प्रकरणे?

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 12 मे पासून भारतात 164 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 69 प्रकरणे आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात 44, तर तामिळनाडूमध्ये 34 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय कर्नाटकमध्ये कोविड-19 चे 8 नवीन रुग्ण, गुजरातमध्ये 6 आणि दिल्लीमध्ये 3 रुग्ण आढळले. हरियाणा, राजस्थान आणि सिक्कीममध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे.

सिंगापूर, हाँगकाँगमध्ये गंभीर परिस्थिती

सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या आशियाई देशांमध्येही रुग्णांची संख्या वाढतेय. येथे लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या एका अधिकाऱ्याने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, सामान्य परिस्थिती पूर्ववत झाल्यापासून, हाँगकाँगमध्ये दर सहा ते नऊ महिन्यांनी सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान देशात 14,200 रुग्ण आढळले आहेत. मे महिन्यात, हाँगकाँगमध्ये कोविड 19 चे 31 गंभीर रुग्ण आढळले. त्यामुळे आता आपले सरकारही आधीच अलर्ट मोडवर राहिलं आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.