बिहारमध्ये पुन्हा भाजप संकटात? लालू-नितीश एकत्र येणार?; राबडीदेवी काय म्हणाल्या?

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत सत्ता स्थापन करताच भाजपने अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे सहा आमदार फोडल्याने जेडीयूमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. (RJD leaders will discuss Nitish's return to Grand Alliance: Rabri Devi)

बिहारमध्ये पुन्हा भाजप संकटात? लालू-नितीश एकत्र येणार?; राबडीदेवी काय म्हणाल्या?

पाटणा: बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत सत्ता स्थापन करताच भाजपने अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे सहा आमदार फोडल्याने जेडीयूमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हीच अस्वस्थता हेरून बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेत्या राबडी देवी यांनी बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड होण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार यांना पुन्हा महाआघाडीत सामील करून घेण्याबाबत पक्षाचे नेते विचार करतील. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह सर्व नेते त्यावर चर्चा करणार आहेत, असं राबडीदेवी यांनी सांगून बिहारमधील मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. (RJD leaders will discuss Nitish’s return to Grand Alliance: Rabri Devi)

भाजपने अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे आमदार फोडले. बिहारमध्येही जेडीयूचे आमदार भाजपा फोडू शकते. भाजप सुरुवातीला काहीच सांगत नाही. ते करून दाखवतात, असं सांगून राबडी देवी यांनी खळबळ उडवून दिली आहे. अरुणाचल प्रदेशातील घडामोडीनंतर जेडीयूमध्ये भाजपविरोधात प्रचंड नाराजी आहे. भाजप आघाडी धर्म पाळत नसून उद्या बिहारमध्येही पक्षाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असं जेडीयूला वाटत आहे. त्यामुळे जेडीयू आरजेडीसोबत हातमिळवणी करू शकतो, असं जेडीयू सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांना वाटतंय. त्यामुळे नितीश कुमार यांना महाआघाडीत आणण्यासाठी स्वत: लालू प्रसाद यादवच सक्रीय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नितीश कुमारांवर टीका करण्यास मनाई

नितीश कुमार महाआघाडीत येण्याची शक्यता असल्याने लालू प्रसाद यादव यांनी कुटुंबातील सदस्यांना आणि आरजेडी नेत्यांना कोणत्याही सदस्यांना नितीश कुमार यांच्यावर टीका न करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे लालूंच्या कुटुंबातील एकही सदस्य नितीश कुमार यांच्यावर टीका करताना दिसत नाही. कोणतंही विधान करताना विचार करूनच बोला अन्यथा त्या विधानावर स्पष्टीकरण मागितलं जाईल, अशी सक्त ताकीदही पक्षातील नेत्यांना लालूंनी दिल्याची सूत्रांनी सांगितलं.

शरद पवारांची मदत घेणार?

नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत यावेत म्हणून लालूंनी मोर्चा सांभाळतानाच यूपीएतील बड्या नेत्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नितीश कुमार यांना यूपीएत प्रवेश देण्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वक्तव्य करावं म्हणूनही लालूंकडून प्रयत्न केले जात आहेत. याबाबत लवकरच पवारांशी संपर्क साधला जाऊ शकतो, असंही सूत्रांनी सांगितलं. (RJD leaders will discuss Nitish’s return to Grand Alliance: Rabri Devi)

 

संबंधित बातम्या:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचं निधन

17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला

(RJD leaders will discuss Nitish’s return to Grand Alliance: Rabri Devi)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI