AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : हिंदू राष्ट्राची चर्चा, RSS ची काय दिशा? सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान

RSS Chief Mohan Bhagwat : सध्या हिंदू राष्ट्राची मोठी चर्चा सुरू आहे. बंगळुरू येथे संघाच्या शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी संघाचे पुढील उद्दिष्ट काय याचा ऊहापोह केला आहे.

Mohan Bhagwat : हिंदू राष्ट्राची चर्चा, RSS ची काय दिशा? सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत
| Updated on: Nov 09, 2025 | 12:18 PM
Share

Mohan Bhagwat at Bengaluru : सध्या हिंदू राष्ट्राची मोठी चर्चा सुरू आहे. बंगळुरू येथे संघाच्या शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे. संघाच्या शताब्दीनिमित्त बंगळुरू येथे भागवत यांच्या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्पसत्र गुंफण्यात आले. त्यांनी यावेळी हिंदू राष्ट्राच्या जीवन ध्येय आणि संघाची पुढील वाटचाल यावर मोठे भाष्य केले आहे. यापूर्वी दिल्लीतून संघाने मोठे प्रबोधन केले होते. संघाची भूमिका आणि त्याविषयीचे गैरसमज यावर त्यांनी प्रकाश टाकला होता. आता दोन दिवसीय व्याख्यानमालेत ते संघाची भूमिका विषद करतील.

हिंदू राष्ट्राचे ध्येय तरी काय?

हिंदू राष्ट्राचे जीवन ध्येय काय आहे? या विषयावर सरसंघचालकांनी विचारपुष्प गुंफले. स्वामी विवेकानंदर यांनी प्रत्येक राष्ट्राच्या पुर्ततेचे ध्येय असते. भारताचे जगाला धर्म देणे हे ध्येय आहे. धर्माची तुलना अनेकदा चुकीच्या पद्धतीने करण्यात येते. धर्मापासून निर्माण झालेला धर्म म्हणजे बांधणे; तो देवापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने करावयाच्या आणि करू नये अशा गोष्टींचा संच असल्याची फोड डॉ. भागवत यांनी केली. जीवनाचे मूळ स्वरुप, कर्तव्य, संतुलन, शिस्त आणि अतुट तत्व अशी धर्माची व्याप्ती खूप मोठी असल्याचे सरसंघचालक म्हणाले. आग निर्माण करणे हा अग्नीचा धर्म आहे. त्याचप्रमाणे धर्म सृष्टीला टिकवून ठेवतो. तो अतिरेक टाळतो असे भागवत यांनी स्पष्ट केले.

भौतिक प्रगतीने जीवन सोपे, पण समाधान नाही

सरसंघचालकांनी सध्याच्या भौतिक प्रगतीवरही कटाक्ष टाकला. मानवजातीला या भौतिक सुखातूनही खकरा आनंद, समाधान, संतोष मिळाला नसल्याचे मत त्यांनी मांडले. प्रत्येक जण आनंदाच्या शोधत आहे. सध्या जीवन सोपं झालेलं आहे. पण समाधानाचा अभाव आहे. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती केली. परंतु संघर्ष आणि अशांतता सुरूच आहे. आपल्याला शरीर, मन आणि बुद्धीचे ज्ञान मिळाले आहे. पण या तिघांचा मिलाफ करणारे रसायन सापडलेले नाही. तो दुवा आपल्याला माहिती नाही असे निरीक्षण भागवतांनी नोंदवले. व्यक्तिकेंद्री समाज, समाजातील दरी आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे मानवावर ही वेळ आल्याचे मंथन त्यांनी यावेळी केले. जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा वैयक्तिक स्वातंत्र्य दडपले जाते. तर जेव्हा तंत्रज्ञानाचा अधिक वापर होते तेव्हा निसर्गाचा ऱ्हास होतो. जी कडी हरवली आहे, ती म्हणजे, ते तत्व म्हणजे धर्म असल्याचे मत सरसंघचालकांनी मांडले. त्यांनी यावेळी द इलेव्हन्थ अवर या पर्यावरणावरील चित्रपटाचाही उल्लेख केला. निसर्गासोबत जगायचे तर संयम अत्यावश्यक असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

प्राचीन ऋषीमुनींना सत्य कळले

आपल्या प्राचीन ऋषीमुनींना या असमाधानाचे कारण अगोदरच कळले होते. ज्यांना वेळ आणि शांतीचे महत्त्व जाणवले होते. त्यांनी तप सिद्धीद्वारे त्याचे सत्य शोधले होते. त्यांना जाणवले की एकच आत्मा सर्व प्राण्यांमध्ये व्यापून आहे. एकदा हे सत्य साकार झाले की समाधान मिळते. एकतेची जाणीव शरीर, मन आणि बुद्धी यांना जोडते. ते व्यक्ती, समाज आणि निसर्गाला जोडते. धर्म हा संतुलन जोडणारे तत्व असल्याचे भागवत म्हणाले.

हिंदूराष्ट्राच्या जीवनाचे उद्दिष्ट काय?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही हिंदू राष्ट्राच्या जीवन मोहिमेची उत्क्रांती आहे. त्यातील पहिला टप्पा हा समाज तयार करणे हा आहे, पण ते कार्य अद्याप अपूर्ण असल्याचे सरसंघचालक म्हणाले. संघाचे कार्य भारतातील प्रत्येक स्तरात, गावात आणि वर्गात विस्तारण्याची योजना आहे. हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी आपण समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत, सर्व विविधतेतून पोहोचले पाहिजे यावर त्यांनी जोर दिला.

तर हिंदू म्हणून ओळख न देणाऱ्या समुदायांशी संघ संवाद साधत असल्याचे आग्रही मत त्यांनी मांडले. त्यांचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे एकत्र चालण्यासाठी आपण संवाद वाढवू. ते संघाच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत नसले तरी समाजाच्या भल्यासाठी सगळेच काम करत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकाने केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...