मोठी बातमी! रशियाचं भारताला मोठं गिफ्ट; दिली ही ऑफर, ट्रम्प यांना जोरदार हादरा
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांच्यामध्ये एक बैठक झाली, या बैठकीमध्ये रशियानं भारताला मोठी ऑफर दिली आहे.

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार आहे. याचा भारताला फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आता भारतासाठी एक गूड न्यूज आली आहे. रशियानं भारताला मोठं गिफ्ट दिलं आहे. पुन्हा एकदा रशियानं भारतासोबतचे आपले मैत्रिचे संबंध आणखी मजबूत केले आहेत.
अमेरिकेनं भारतावर लावलेलं टॅरिफ अयोग्य असल्याचं रशियानं म्हटलं आहे. एवढंच नाही तर भारत हा आपल्या दीर्घकालीन ऊर्जा धोरणातील एक मोठा भागीदार आहे, जर अमेरिकेनं भारतासाठी व्यापाराचे दरवाजे बंद केले तर आम्ही आमच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंचं स्वागत करू, असंही रशियानं यावेळी म्हटलं आहे. दरम्यान लिक्वेफाइड नॅचरल गॅस (LNG) च्या निर्यातीची ऑफर देखील रशियाकडून भारताला देण्यात आली आहे, एवढंच नाही तर आम्ही भारताला 5 टक्के सवलतीच्या दरामध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा करू, अशी माहिती देखील यावेळी रशियाकडून देण्यात आली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांच्यामध्ये एक बैठक झाली, या बैठकीमध्ये रशियानं भारताला ही ऑफर दिली आहे. दोन्ही देशांनी आता अणुऊर्जेवर आणखी काम करण्याची गरज आहे, रशिया भारताला पूर्वीपासूनच कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करतो. आता ही भागिदारी आम्ही पुढच्या स्थरावर नेऊ इच्छितो. रशिया न्यूक्लियर सेक्टर आणि LNG निर्यात या सारख्या क्षेत्रामध्ये भारताला मदत करेल असंही यावेळी डेनिस मंटुरोव यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी भारतावर लावलेला टॅरिफ हा चुकीचा आहे, भारत हा एक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. याचा आंतरराष्ट्रीय स्थरावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रशिया नेहमीच भारताची मदत करेल, सध्याच्या परिस्थितीमध्ये भारता सोबतचं सहकार्य वाढवण्याची ही योग्य वेळ आहे, असंही यावेळी रशियाच्या उपपंतप्रधानांनी यावेळी म्हटलं आहे.
