AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, काय म्हणाले सरन्यायाधीश ?

सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत होणाऱ्या कॉकरोच जनता पक्षाच्या रॅलीवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलन काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही केले आहे.

अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, काय म्हणाले सरन्यायाधीश ?
abhijeet dipke
| Updated on: Aug 31, 2026 | 5:35 PM
Share

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली कॉक्रोच जनता पार्टीच्या ५ सप्टेंबरच्या रॅलीला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या रॅलीच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. भारताचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या समोर या याचिकेची सुनावणी झाली. सीजेपीने केंद्र सरकारवर २५ जुलै रोजी जंतरमंतर आंदोलनावेळी दिलेले आश्वासन पाळलेले नसल्याने सीजेपीने पुन्हा दिल्लीत येत्या ५ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बातमीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्यकांत म्हणाले की असे मानण्यास ठोस कारण नाही की कोणती अप्रिय घटना होईल. वास्तविक याचिकेद्वारे BRICS शिखर परिषदत पूर्ण होईपर्यंत प्रस्तावित निदर्शनांना रोखण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.आणि विशेष म्हणजे हे शिखर संमेलन १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आहे. तर सीजेपीची निदर्शने ५ सप्टेंबर रोजी आहेत.

काय म्हणाले सरन्यायाधीश सुर्यकांत ?

या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सुर्यकांत म्हणाले की अधिकाऱ्यांकडून कायदा आणि सुववस्था राखण्याची आशा व्यक्त केली जा असते. ते म्हणाले की सर्व पक्ष शांततापूर्ण आणि जबाबदारीने काम करत असून कायद्याने बांधिल आहेत.

CJP चा प्लान काय ?

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत ५ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा सोमवारी केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सरकारवर आरोप केला आहे की त्यांनी २५ जुलै रोजी दिलेली आश्वसनाना पूर्ण केलेले नाही. ज्याच्या आधारे परीक्षेतील घडबडीविरोधात सीजेपीने त्यांचे ३६ दिवसांचे जंतरमंतर वरील आमरण उपोषण मागे घेतले होते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी काढण्यात येणारा हा मार्च इंडिया गेट पासून सुरु होईल दिल्ली पोलिस मुख्यालयापर्यत चालणार आहे.

नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर फेर नीट परीक्षा घेण्याच्या निर्णयाने ज्या पालकांच्या पाल्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबिय दिल्लीतील ५ सप्टेंबरच्या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे.

अलिकडेच सीजेपीच्या कार्यसमितीची बैठक झाली होती. ज्या दिल्ली आंदोलनाचा निर्णय घेतला होता. सीजेपीने म्हटले होती की आमच्या धैर्याला आमची कमजोरी समजू नये. आमच्या सद्भावनेला सरकारला देशातील तरुणांचा विश्वासघात करण्याची संधी बनू देता कामा नये.

जंतरमंतरमध्ये झाली होती हिंसा

सीजेपीचे आंदोलन पेपर लीक मुद्यावरुन २० जून रोजी जंतरमंतरला सुरु झाले होते. त्यानंतर देशाच्या अन्यभागातही हे आंदोलन पसरले होते. २० जुलै रोजी संघटनेच्या नेतृ्त्वा खाली संसदेवर मोर्चा काढण्यात आला त्यावेळी आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. या दरम्यान अनेक जण जखमी झाले होते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन अखेर संपले. कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्ठमंडळासोबत सरकारने चर्चा करीत त्यांच्या मागण्या जाणून घेत त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांना नुकसान भरपाई आणि निदर्शकांवर कायदेशीर कारवाई मागे घेण्याची मागणी यावेळी सीजेपीने केली होती.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले..
CM Devendra Fadnavis | डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, थेट म्हणाले...
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
मराठी सक्तीची मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे नेमका हेतु काय? अंजली दमानियांच्या वक्तव्याची तुफन चर्चा
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत