AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का; विज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी ‘एम्स’ला निधी

या संशोधनासाठी कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या 20 जणांची निवड केली जाणार आहे. | COVID 19 coronavirus Gayatri Mantra

गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का; विज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी 'एम्स'ला निधी
| Updated on: May 06, 2021 | 11:33 AM
Share

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत असताना केंद्रीय विज्ञान मंत्रालयाचा एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने कोरोना (Coronavirus) बरा होऊ शकतो का, यावर संशोधन करण्यासाठी ह्रषिकेश येथील एम्स रुग्णालयाला तीन लाखांचा निधी दिला आहे. (Science Ministry funds trial on effect of Gayatri Mantra in treating COVID 19)

एम्स रुग्णालयात करण्यात येणाऱ्या या संशोधनासाठी कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या 20 जणांची निवड केली जाणार आहे. यापैकी एका गटाला नेहमीच वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. तर दुसऱ्या गटाला नेहमीच्या उपचारांसोबत आयुर्वेदिक औषधे, गायत्री मंत्राचे पठण आणि योगासने करायला सांगितली जातील. त्यानंतर दोन्ही गटाच्या रुग्णांवर काय परिणाम झाले आहेत, हे तपासले जाईल.

‘देशात लोक मरतायत, पण परदेशातून येणारी वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवरच धूळ खात पडलेय’

या संशोधनासाठी एम्स रुग्णालयाला तीन लाखांचा निधी देण्यात आला आहे. रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स तैनात असतील. साधारण दोन ते तीन महिने हे संशोधन चालेल. या काळात रुग्णांना नेहमीच्या औषधांसोबत पतंजलीचे कोरोनील हे आयुर्वेदिक औषधही देण्यात येईल. या उपचारांनी कोरोना रुग्णांना काही मदत होते का, हे तपासले जाईल, अशी माहिती डॉ. रुची दुआ यांनी दिली.

देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, चार लाखांहून अधिक नवे रुग्ण, एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळी

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट (Corona Cases in India) होताना पाहायला मिळाला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 980 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले असून एका दिवसात सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. (India reports record break 412262 new COVID19 cases in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या दोन दिवसापासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी होत होता. मात्र आज पुन्हा एकदा 24 तासातील रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 12 हजार 262 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 980 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 29 हजार 113 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?

(Science Ministry funds trial on effect of Gayatri Mantra in treating COVID 19)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.