Share Market : शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन! 4 महिन्यांनी सेन्सेक्स 60 हजारावर, गुंतवणूकदार मालामाल

सकाळी 10.48 वाजता सेन्सेक्स मंगळवारच्या बंदच्या तुलनेमध्ये 0.5 टक्क्यांनी वाढून 60,149 अंकांवर पोहचला आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सेन्सेक्सने शेवटचा 60 हजारचा टप्पा पार केला होता.

Share Market : शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन! 4 महिन्यांनी सेन्सेक्स 60 हजारावर, गुंतवणूकदार मालामाल
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 1:32 PM

नवी दिल्ली: बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्सने 4 महिन्याच्या दीर्घ  प्रतिक्षनंत आज सकाळी सेन्सेक्सने 60 हजारच्या आकडा पार (Sensex crossed the 60 thousand mark)  केला. सेन्सेक्सच्या या घटनेमुळे यूएस (US) आणि भारत (India) या दोन्ही देशांमधील आणि भारतीय भांडवली बाजारात परदेशी निधीच्या नव्या प्रवाहामुळे गुंतवणूकदारांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद वाढला आहे. सकाळी 10.48 वाजता सेन्सेक्स मंगळवारच्या बंदच्या तुलनेमध्ये 0.5 टक्क्यांनी वाढून 60,149 अंकांवर पोहचला आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सेन्सेक्सने शेवटचा 60 हजारचा टप्पा पार केला होता.

View this post on Instagram

A post shared by Asian News International (@ani_trending)

गेल्या पाच आठवड्यांपासून भारतीय शेअर्समधील या घटना सुरूच आहेत. गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत शेअरची सातत्याने विक्री करण्यात येत होती.

आर्थिक धोरण कडक करणे

जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) प्रगत अर्थव्यवस्थेचे आर्थिक धोरण कडक करणे, डॉलरची वाढत्या मागणीमुळे आणि उच्च परताव्यासह अशा विविध कारणांमुळे गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून भारतीय बाजारात सातत्याने शेअरची विक्री करत होते. यूएस बॉण्ड्सनी 2022 ते आतापर्यंत 202,250 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. असं एनएसडीएलच्या डेटा दर्शवतो.

भारतात चलनवाढ घसरली

तर जुलैमध्ये तर एकूण 4,989 कोटी रुपयांच्या शेअरवर खरेदी व निव्वळ खरेदीदार होते. ऑगस्टमध्ये आतापर्यंत त्यांनी आणखी 22,453 कोटी रुपयांच्या इक्विटी खरेदी केल्या असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. यूएसची घसरलेली चलनवाढ, फेडला आक्रमकपणे दर वाढवण्याची गरज नसल्याचा आत्मविश्वास आणि यूएस अर्थव्यवस्थेच्या सॉफ्ट लँडिंगची वाढती शक्यता असल्याचेही अहवालात म्हटले आहे. भारतात, सतत घसरत चाललेली चलनवाढ, अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग आणि FII सातत्याने त्याकडे वळत आहेत.

सेन्सेक्स आणि निफ्टी-एकत्रित 10-11 टक्क्यांनी वाढली

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, बेंचमार्क निर्देशांक-सेन्सेक्स आणि निफ्टी- एकत्रित आधारावर जवळपास 10-11 टक्क्यांनी वाढली आहे, ज्यामुळे 2022 मध्ये त्यांनी पाहिलेले संपूर्ण नुकसान मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आले आहे.

गुंतवणूकदार 25 ट्रिलियन रुपयांनी श्रीमंत

यामधील उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, सध्या सुरू असलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर गुंतवणूकदार सुमारे 25 ट्रिलियन रुपयांनी श्रीमंत झाले आहेत. अखिल भारतीय बाजार भांडवल 11 जुलै रोजी रु. 25,319,892 कोटींवरून मंगळवारच्या शेवटच्या माहितीनुसार 27,792,290 पर्यंत वाढले असल्याचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार दिसून आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.