सीरम इन्स्टिट्यूट स्पुतनिक वी लसीची निर्मिती करणार? केंद्र सरकारकडे परवागनी मागितली, सूत्रांची माहिती

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं बुधवारी डीसीजीआयला स्पुतनिक वी लसीच्या निर्मितीसाठी चाचणी परवाना देण्यासंबंधी अर्ज केल्याची माहिती आहे. Serum Institute Sputnik V

सीरम इन्स्टिट्यूट स्पुतनिक वी लसीची निर्मिती करणार? केंद्र सरकारकडे परवागनी मागितली, सूत्रांची माहिती
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 1:00 PM

नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे रशियाच्या स्पुतनिक वी या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीसाठी टेस्ट लायसन्स मागितलं आहे. ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या सीरम भारतामध्ये कोविशिल्ड लसीचे उत्पादन करत आहे. कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापरला भारत सरकारनं मंजुरी दिलेली आहे. (Serum Institute of India applies to the Drug Controller General of India seeking permission for a test license to manufacture Sputnik V)

सीरम स्पुतनिक लस बनवाणार?

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं बुधवारी डीसीजीआयला स्पुतनिक वी लसीच्या निर्मितीसाठी चाचणी परवाना देण्यासंबंधी अर्ज केल्याची माहिती आहे. रशियाची स्पुतनिक वी लस सध्या भारतात तयार करण्याचं काम डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी करत आहे.दुसरीकडे सीरमनं जून महिन्यात भारत सरकारला कोविशील्ड लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याचं यापूर्वीचं जाहीर केलं आहे. बुधवारी रशियाच्या स्पुतनिक वी लसीचे 30 हजार डोस भारतातील हैदराबाद येथे पोहोचले आहेत.

सीरम नोवावॅक्स लस बनवणार

सीरमकडून नोवावॅक्स लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या परवानगीची आवश्यकता आहे. एप्रिलमध्ये डीसीजीआयनं यासाठी आपत्कालीन परावनगी दिलेली आहे.

पॅनेशिया बायोटेक स्पुतनिक वीचे 10 कोटी डोस बनवणार

भारतीय औषध निर्माती कंपनी पॅनेशिया बायोटेकनं बनवलेली स्पुतनिक वी लसीची पहिली खेप चाचणीसाठी रशियाला रवाना करण्यात आली आहे. रशियात त्या लसीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात येणार आहे. स्पुतनिक वी लसीची निर्मिती हिमाचल प्रदेशातील एका कंपनीमध्ये करण्यात आळी आहे. गुणवत्ता चाचणी यशस्वी ठरल्यास उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.

रशियाची आरडीआयएफ आणि पॅनेशिया बायोटेक यांच्यासोबत एप्रिलमध्येच स्पुतनिक वी लसीचं उत्पादन करण्याबाबत चर्चा झाली होती. पॅनेशिया बायोटेक यावर्षाच्या अखेरपर्यंत 10 कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. आरआयडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिमित्रीव यांनी पॅनेशिया बायोटेकच्या साथीनं कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन या महामारीशी लढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असं म्हटलं.

संबंधित बातम्या:

भारतात आज पोहोचणार रशियन लस Sputnik V ची पहिली खेप, कोरोनाविरुद्धची लढाई आणखी तीव्र होणार

Sputnik V लसीची कमतरता संपणार, ‘ही’ कंपनी भारतातच करणार उत्पादन

(Serum Institute of India applies to the Drug Controller General of India seeking permission for a test license to manufacture Sputnik V)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.