7 देशांचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, डोनाल्ड ट्रम्प यांना जागा दाखवली, भारतासाठी मोठी गुडन्यूज
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आधी टॅरिफ लावला, त्यानंतर एच 1बी व्हिसावरील शुल्क वाढवलं. याचा मोठा फटका भारताला बसला आहे, मात्र आता एक गुडन्यूज समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतावर दबाव टाकण्यासाठी व्हिसा वॉर सुरू केलं आहे. त्यांनी एच-1बी व्हिसावर तब्बल 1 लाख डॉलर एवढं शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे, जे भारतीय चलनामध्ये तब्बल 88 लाख रुपये एवढं आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारतालाच बसला आहे, H-1B व्हिसावर प्रचंड शुल्क लावण्यात आल्यानं नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचं अनेकांचं स्वप्न हे आता स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यातच आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक गुडन्यूज समोर आली आहे. भारतासाठी दिलासादायक बातमी आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर शुल्क वाढवल्यानंतर आता सात देशांनी भारतातील कुशल मनुष्यबळाला आपल्या देशांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आयटीचं हब म्हणून ओळखला जाणारा युरोपीय देश फिनलँड आणि तैवानसह कॅनडा, जर्मनी, इंग्लंड, दक्षिण कोरिया आणि चीन या सात देशांचा समावेश आहे. या सातही देशांकडून आता भारतातील आयटी, मेडीकल आणि विज्ञान क्षेत्रातील कुशल तरुणांना आपल्या देशामध्ये येण्यास प्रोहत्साहीत केलं जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर चीनकडून खास व्हिसा के तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे चीनमध्ये प्रवेश मिळवणं सोप होणार आहे, तर युकेनं मोठी घोषणा केली आहे, भारतीय तरुणांसाठी जे रोजगारासाठी येऊ इच्छितात त्यांच्यासाठी व्हिसा फ्री करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचसोबत कॅनडाकडून देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे, अमेरिकेनं लावलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे ज्यांना अमेरिकेला जाणं शक्य नाही, ते कॅनडामध्ये येऊ शकतात. त्यांना सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करून देऊ असं कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सोबतच तैवान आणि दक्षिण कोरियाची देखील भारताच्या कुशल मनुष्यबळावर नजर असून, त्यांच्याकडून देखील हे मनुष्यबळ आपल्या देशात वळवण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. अमेरिकेनं व्हिसावरील वाढवलेल्या शुल्कानंतर ही भारतासाठी दिलासा देणारी बातमी आहे. तर दुसरीकडे जर्मनी देखील भारतीय मनुष्यबळाला आपल्या देशात स्थलांतरीत करण्यासाठी विविध उपक्रम राबवताना दिसत आहे.
