AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्ण देशच पागल आहे; पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय म्हणत शाहीद अफ्रिदिने काढली रॅली, झाला टीकेचा धनी

सध्या सोशल मीडियावर शाहीद अफ्रिदिने रॅली काढली आहे. या रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय नेटकऱ्यांनी अफ्रिदीला चांगलेच सुनावले आहे.

पूर्ण देशच पागल आहे; पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय म्हणत शाहीद अफ्रिदिने काढली रॅली, झाला टीकेचा धनी
Shahid AfridiImage Credit source: Social Media
| Updated on: May 12, 2025 | 12:43 PM
Share

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांचा जीव घेतला. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदू’च्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची माहिती भारताच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) रविवारी पुराव्यांसह दिली. त्यानंतर पाकिस्तानकडून भ्रामक दावे करण्यात येत आहे. त्यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीचा देखील सहभाग आहे. त्याने चक्क ‘पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय’ असे म्हणत रॅली काढली आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्या झाल्यापासूनच शाहीद अफ्रिदिने बरळत होता. तो सतत भारताचे अपयश असल्याचे सुनवत होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवल्यानंतरही तो शांत बसला नाही. तो या सगळ्यात पाकिस्तानही पाकिस्तानचा विजय असे म्हणत आहे. त्याने युद्ध थांबल्यानंतर कराचीमध्ये रॅली काढली आहे. या रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय लोकांना हसू अनावर झाले आहे. अनेकांनी कमेंट करत अफ्रिदिला चांगलेच सुनावले आहे. वाचा: एकत्र फिरले, नूडल्स-आईस्क्रीम खाल्ले; शारीरिक संबंधानंतर बॉयफ्रेंडनेच जे केलं ते पाहून पोलिसांनाही बसला धक्का

काय आहे व्हिडीओ?

व्हिडीओमध्ये शाहीद अफ्रिदी पाकिस्तानी लष्कराच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. तसेच तो एका जीपमध्ये बसलेला आहे. त्याच्यासोबत त्याचे इतर काही सहकारी आहेत. त्याने ही रॅली पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय असे म्हणत काढली आहे. एका एक्स सोशल मीडिया यूजरने शाहीदचा हा व्हिडीओ शेअर करत, ‘पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी शाहीद अफ्रिदीने कराचीमध्ये ही रॅली काढली आहे. बुम बुम आमचा पाकिस्तानच्या लष्कराला पाठिंबा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

Afridi

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत, ‘कोणता इतिहास? यांचा पूर्ण देशच पागल आहे. भीकेत मिळालेल्या माफीला इतिहास सांगत आहेत’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘असं वाटत आहे हा पाकिस्तानचा पुढचा इमरान खान होणार आहे’ अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘बड़ा दिलवाला देश है पाकिस्तान , तब भी जश्न मनाते है कुछ नहीं हुआ कुछ नहीं हुआ बोलके’ असे म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरोधात केवळ चार दिवसांत भारताला यश मिळाले. या चार दिवसांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी मारले गेले आहे. ही संख्या १०० पेक्षा जास्त आहे. त्यात पाच मोठ्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. सीमारेषेवर पाकिस्तानचे ४० जवान ठार झाले आहेत. तसेच पाकिस्तानच्या गोळीबारास तोफगोळ्यांनी उत्तर दिले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.