Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशात ‘जालियनवाला बाग’सारखी परिस्थिती, देशातील शेतकरी उत्तर देतील : शरद पवार

देशातला शेतकरी याच केंद्राला उत्तर देईल. केंद्र असो की राज्य सरकार, या घटनेची संपूर्ण दबाबदारी भाजपची आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा, आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले.

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशात 'जालियनवाला बाग'सारखी परिस्थिती, देशातील शेतकरी उत्तर देतील : शरद पवार
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सत्तेचा गैरवापर करुन दडपशाही शुरु आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळणार नाही, असं म्हणत लखीमपूर घटनेवर शरद पवार संतप्त झाले. उत्तर प्रदेशात जालीयनवाला बागसारखी परिस्थिती आहे, देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही, असं शरद पवार म्हणाले.  शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

2 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं जातं, शेतकरी नेत्यांना रोखलं जात, हा सत्तेचा गैरवापर केला जातोय. देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांसोबत असेल. देशातील जनता सरकारला धडा शिकवेल. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण भाजपला यात यश मिळणार नाही. देशातला शेतकरी याच केंद्राला उत्तर देईल. केंद्र असो की राज्य सरकार, या घटनेची संपूर्ण दबाबदारी भाजपची आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा, आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

देशातील शेतकरी काही मुद्यांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारविरोधात शांततेत आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचा एक गट आंदोलन करत आहे. हे आंदोलन शांततापूर्णपणे आंदोलन करण्यात येत आहे. 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर यंत्रणेनं तो दडपण्याचा प्रयत्न केला, असं शरद पवार म्हणाले.

दुर्घटनेला भाजप जबाबदार

लोकशाहीत शांततेत आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याचं अधिकारानं लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही लोकांनी विशेषत, भाजप सरकारांमध्ये सत्तेत सहभागी असणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांवर गाडी चालवून दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही शेतकऱ्यांची हत्या झाली, आणखी काही लोकांची हत्या झाली आहे. काही गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार 6 ते 8 शेतकऱ्यांची जबाबदारी दिल्लीतील केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारची जबाबदारी आहे, असं शरद पवार म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी

शेतकऱ्यांवर ज्या प्रकारे हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो. फक्त निषेध करुन चालणार नाही याची चौकशी झाली पाहिजे. वृत्तपत्रात वाचल्यानुसार उत्तर प्रदेश सरकारनं जबाबदारी घेणार असल्याचं वाचनात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.

संपूर्ण देशातील शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया मिळेल

शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला त्यातून केंद्र सरकारचा शेतकऱ्यांप्रती दृष्टिकोन समोर आला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचं नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांकडून दिली जाईल. काँग्रेसचे नेते आणि शेतकऱ्यांचे नेते त्यांना तिथं जाण्यापासून रोखलं जातं याचा मी निषेध करतो.

शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, आम्ही देशभर विरोधी पक्षात काम करणारे लोक शेतकऱ्यांसोबत राहणार आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम करता येईल ते काम करु, असा विश्वास शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

उत्तर प्रदेशातील सरकार संवेदनाहीन असल्याचं दिसतंय. शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिथं दु: ख व्यक्त करायला जाणाऱ्यांना अडवलं जातं. इंग्रजांनी जालियानवाला बागेत जी स्थिती निर्माण केली होती. ती स्थिती उत्तर प्रदेशात दिसतेय, असा आरोप शरद पवारांनी केली आहे

शरद पवार यांची पत्रकार परिषद

शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला दिल्लीत येऊन आंदोलन केलं, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, त्याचा संताप देशभरातून व्यक्त झाला.
शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. प्रत्येकाला शांततेत आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारातूनच शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत.

आपल्या अधिकारासाठी उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पण शेतकऱ्यांना गाडीने चिरडण्यात आलं. या हल्ल्याचा मी निषेध करतो. केवळ निषेध नाही तर या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी.

केंद्र असो की up सरकार, अंगावर गाडी चालवली गेली, त्यात काहींचा मृत्यू झाला. जे काही समोर आलं, त्यानुसार 8 शेतकरी मृत झाले, याची जबाबदारी भाजप सरकारची आहे.

उत्तर प्रदेश सरकारने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हवेत, म्हणजे सत्य समोर येईल, असं शरद पवार म्हणाले.

आज शांततेत आंदोलन करण्याचा हक्क शेतकऱ्यांना होता, पण हल्ला झाला त्यावरून केंद्र सरकारची नियत दिसून येते.

संबंधित बातम्या  

UP Lakhimpur Kheri new viral video : लखीमपूर खीरीतील थरारक व्हिडीओ, आंदोलकांना जिवंत चिरडलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI