AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजे भोसलेंचा इशारा

रद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत. महाविकासआघाडी ही शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत आहे. | Sharad Pawar

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजे भोसलेंचा इशारा
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 11, 2021 | 7:28 PM
Share

मुंबई: महाविकासआघाडीच सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातले पाहिजे. अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल. यापूर्वी मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले होते. मात्र, आता काय होईल हे सांगता येत नाही, असा गंभीर इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. (BJP MP Udayanraje Bhosale meets Sharad Pawar for Maratha Reservation issue)

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत. महाविकासआघाडी ही शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत आहे. या सगळ्याची बांधणी त्यांनीच केली. त्यामुळे राज्य सरकारला सांगून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे, हेदेखील शरद पवार यांचेच काम आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

शरद पवारांची भेट घेतली, मोदींची भेट घेणार का?

यावेळी प्रसारमाध्यमांनी उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी म्हटले की, “हा प्रश्न राजकीय नाही, हा राजकीय मुद्दा नाही. राजकारण कुणी आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. या समाजासाठी सत्तेत जे आहेत महाराष्ट्रात, पाहिलं तर मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला हवी, ती होताना दिसत नाही.

मी पवारसाहेबांना सांगितलं आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला दिलं पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

‘श्वेतपत्रिका काढा, लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी काय करतायंत हे समजू द्या’

गायकवाड आयोगाच्या अहवालाने सखोल अभ्यास करुन मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा निष्कर्ष काढला होता. राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकले. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडताना दिसत आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन दिशाभूल करु नये. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसेल तर तसे सांगावे. अन्यथा एक श्वेतपत्रिका काढावी. जेणेकरून मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधी काय करतात, हे जनतेला समजेल, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

(BJP MP Udayanraje Bhosale meets Sharad Pawar for Maratha Reservation issue)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...