Jaggery Explosive : हाय रे दैवा! तो गुळाचा खडा नव्हताच, तिने तर साक्षात मृत्यू पाहिला

Jaggery Explosive : तिने हातात घेतला तो गुळाचा खडा नव्हताच, तिने तर मृत्यूलाच पाहिले अगदी जवळून...

Jaggery Explosive : हाय रे दैवा! तो गुळाचा खडा नव्हताच, तिने तर साक्षात मृत्यू पाहिला
तिने मृत्यू जवळून पाहिला
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 6:36 PM

नवी दिल्ली : बिहारमधील बक्सर जिल्हा (Buxar District) ही कुख्यात आहे. नक्षली कारावायांसाठी हा जिल्हा देशाच्या नकाशावर आहे. अनेक कुख्यात नक्षलवादी याच जिल्ह्यात दडून बसलेले असतात. घनदाट जंगले, ग्रामीण भागातील असुविधांचा फायदा घेत, नक्षलवाद्यांनी (Naxal) या भागात चांगलाच जम बसवला आहे. आता याच बक्सर जिल्ह्यातून आणखी एक खतरनाक घटना समोर येत आहे. या भागातील एका महिलेला गुळाचा खडा (Jaggery) मिळाला. तिने तो हाताने तोडण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यानंतर तिने हा गुळ घराच्या गच्चीवर आपटला. तेव्हा तो गुळ नव्हताच, हे समोर आले. या महिलेने साक्षात मृत्यू डोळ्यासमोर पाहिला.

काय घडली घटना या महिलेला दुर्लक्ष करणे महागात पडले. गुळाचा खडा ओळखण्यात झालेली चूक तिच्या जीवावर आली. तिने जमिनीवर फेकलेला गुळाचा खडा नव्हता तर एक जीवंत बॉम्ब होता. तिने तो घराच्या गच्चीवर फेकताच मोठा स्फोट झाला. यामध्ये ती महिला गंभीररित्या जखमी झाली. या स्फोटाचा आवाज आजुबाजूच्या परिसरातही गेला. नातेवाईक, घरातील मंडळी लागलीच धावून आली. या स्फोटामुळे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने वाराणसी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अशी घडली घटना बक्सर जिल्ह्यातील इटाढी पोलीस स्टेशनतंर्गत बाला देवा नावाचे गाव आहे. रामनाथ राम यांच्या घरी कोणी अज्ञाताने बॉम्ब ठेवला. शनिवारी सकाळी रामनाथ यांची पत्नी शांती यांनी हा बॉम्ब पाहिला. त्यांना वाटले हा गुळाचा खडाचा आहे. त्यांनी तो हाताने तोडण्याचा प्रयत्न केला. पण तो फुटता फुटेना. शांती यांनी हा खडा खाली आपटला. तेव्हा जोराचा धमाका झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

हे सुद्धा वाचा

आणि गावकऱ्यांनी घेतली धाव शांती यांनी हा बॉम्ब घराच्या छतावर फेकताच मोठा धमाका झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. यात घराच्या छताचे पण मोठे नुकसान झाले. आवाज ऐकताच घरातील लोक, शेजारी, गावकऱ्यांनी छतावर धाव घेतली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. शांती या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी वाराणसीला हलविण्यात आले.

बॉम्बशोध पथक घटनास्थळी या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लागलीच बॉम्ब शोध पथक, विशेष सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी या संपूर्ण घराची, परिसराची पाहणी केली. पोलिस प्रकरणात महिलेच्या पतीकडून अधिक माहिती घेत आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.