मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत तापणार?; शिवसेना खासदार घेणार पंतप्रधानांची भेट

एकीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जावा म्हणून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. (sanjay raut)

मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत तापणार?; शिवसेना खासदार घेणार पंतप्रधानांची भेट
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 3:37 PM

नवी दिल्ली: एकीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जावा म्हणून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी शिवसेनेने पंतप्रधानांची वेळही मागितली आहे. त्यामुळे संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. (shiv sena mp to meet pm narendra modi over maratha reservation issue)

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची आज बैठक पार पडली. यावेळी राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. मराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर आम्हाला पंतप्रधानांना भेटायचं आहे. पंतप्रधानांची आम्ही वेळ मागत आहोत. वेळ मिळताच पंतप्रधानांना भेटून आमच्या मागण्या सादर करणार आहोत, असं राऊत यांनी सांगितलं.

बैठकीत 11 मागण्यांवर चर्चा

शिवसेना खासदारांच्या आज झालेल्या बैठकीतील तपशीलही राऊत यांनी दिला. महाराष्ट्रातील काही प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना 11 मागण्यांचं निवेदन दिलं आहे. त्यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत. काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत. रेल्वे मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहे. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या 11 मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असं राऊत म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी स्थगन प्रस्ताव

खासदार विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. तो स्विकारला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्विकारावा. मग आमचा अभ्यास किती दांडगा आहे ते पाहावं, असं आव्हानच त्यांनी दानवेंना दिलं. शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असं रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचाही राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला. आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे. पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असं ते म्हणाले. (shiv sena mp to meet pm narendra modi over maratha reservation issue)

संबंधित बातम्या:

आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा, मराठा आरक्षणावर दानवेंचं कोचिंग करू; संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

VIDEO: अशोक चव्हाण एकटेच दिल्लीत, मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी

‘विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना तातडीने मदत द्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त ठिगळं नको’ , दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(shiv sena mp to meet pm narendra modi over maratha reservation issue)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.