धक्कादायक, चॉकलेट घशात अडकल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, शाळेत जाण्यासाठी आईने दिले होते चॉकलेट

ही लहानगी बेशुद्ध पडल्यानंतर तिला शुद्धीत आणण्यासाठी व्हॅनचा ड्रायव्हर आणि कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले. मात्र ती बेशुद्धच पडून होती. त्यानंतर तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

धक्कादायक, चॉकलेट घशात अडकल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, शाळेत जाण्यासाठी आईने दिले होते चॉकलेट
चॉकलेट घशात अडकल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 5:51 PM

बंगळुरु – एका सहा वर्षांच्या चिमुरुडीचा (6 years old Girl) मृत्यू चॉकलेट (chocolate)घशात अडकल्याने झाला आहे. ही वेदनादायी घटना कर्नाटकातील  (Karnataka)उडपी जिल्ह्यात घडली आहे. ही मुलगी स्कूल बसमध्ये चढत असतानाच नेमका हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी शाळेत जाण्यास तयार नव्हती. शाळेत जाण्यासाठी तिच्या आई-वडील आणि घरातील इतरांनी तिला कसेबसे तयार केले. तिच्या आईने या लहानगीची समजूत काढण्यासाठी तिला एक चॉकलेटही दिले. याच काळात स्कूल व्हॅन घराच्या बाहेर येऊन उभी राहिली. ती व्हॅन पाहून या लहानगीने रॉपरसह चॉकलेट तोंडात टाकले. चॉकलेट रॅपटरसह तोंडा टाकल्याने तिचा श्वास कोंडला गेला, स्कूल व्हॅनच्या दरवाजातच ती बेशुद्धावस्थेत पडली. सुरुवातीला नेमकं काय झालं हे कुणालाच कळेना. नंतर तिला श्वास घेता येत नसल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. स्कूल व्हॅनचा ड्रायव्हरही या काळात तिच्या मदतीसाठी खाली उतरुन पुढे धावला. तिच्या घरातील कुटुंबीयही घरातून धावत बाहेर आले. तिच्या हातातले चॉकलेट दिसत नव्हते, त्यावरुन ते चॉकलेट तिने घाईघाईत रॅपरसह गिळल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.

हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तिचा झाला मृत्यू

ही लहानगी बेशुद्ध पडल्यानंतर तिला शुद्धीत आणण्यासाठी व्हॅनचा ड्रायव्हर आणि कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले. मात्र ती बेशुद्धच पडून होती. त्यानंतर तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर या लहानगीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी मणिपाल केएमसी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.

शाळेने जाहीर केली सुट्टी

या प्रकरणात चौकशी करत असलेल्या बैंदूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पोस्टमार्टेम रिपोर्टनंतरच सत्य समोर येईल असे सांगितले आहे. दरम्यान या सहा वर्षांच्या मुलीच्या अनपेक्षित मृत्यूनंतर शोककळा पसरली. शाळेनेही दुखवटा म्हणून सुट्टी जाहीर केली. ही मुलगी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत पहिल्या वर्गात शिकत होती. या अनपेक्षित घटनेने या मुलीच्या घरच्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

मुलांकडे लक्ष देण्याची गरज

यानिमित्ताने पुन्हा एकदा मुलांकडे लक्ष देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लहान मुलांच्या वर्तनाकडे पालकांनी बारीक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात येते आहे. लहान मुले काय खातात, कसे खातात, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येते आहे. लहानग्या मुलांना चॉकलेट, केक सारख्या वस्तू देताना त्याचे वेष्टन काढून त्यांना ती खायला द्यावीत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.