Shraddha Murder Case : डोकं, धड आणि हाताची बोटं… सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय काय?; श्रद्धाच्या हत्येचा गुंता सुटणार?

श्रद्धाच्या मृत्यूनंतर आफताबने तिच्या शरीराचे 36 तुकडे केले होते. एकूण 18 बॅगेत हे तुकडे भरले होते. त्यानंतर तो रोज रात्री दोन वाजता हे तुकडे जंगलात नेऊन टाकत होता.

Shraddha Murder Case : डोकं, धड आणि हाताची बोटं... सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय काय?; श्रद्धाच्या हत्येचा गुंता सुटणार?
डोकं, धड आणि हाताची बोटं... सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय काय?; श्रद्धाच्या हत्येचा गुंता सुटणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 5:22 PM

नवी दिल्ली: दिल्लीच्या महरौलीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता पोलिसांच्या हाती 18 ऑक्टोबरचं एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. यात आरोपी आफताब दिसत आहे. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे त्याच दिवशी फेकल्याचं सांगितलं जातं. मात्र, डोकं, धड आणि बोटं फ्रिजमध्ये ठेवले होते. श्रद्धाच्या हत्येनंतर पाच महिन्याने म्हणजे 18 ऑक्टोबर रोजी त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकले होते. हे तुकडे फेकण्यासाठी तो जंगलात तीनदा गेला होता. दरम्यान, पोलीस आता हे सीसीटीव्ही फुटेज पूर्णपणे पाहणार आहे. त्यानंतरच या हत्याकांडाचं नेमकं चित्रं स्पष्ट होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांचे तुकडे फेकण्यासाठी जात असताना आफताब सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहेत. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आफताब एक बॅग घेऊन जाताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

श्रद्धाच्या शरीराचे आतापर्यंत जे तुकडे मिळाले आहेत, त्याचे डीएनए मिळवण्यासाठी श्रद्धाचे वडील आणि भावाचं रक्त घेतलं जाणार आहे. तसेच आफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

या शिवाय पोलिसांची एक टीम गुरुग्राममधील एका खासगी फर्मच्या कार्यालयात गेली. याच ठिकाणी आफताब पुनावाला काम करत होता. पोलिसांनी या ठिकाणची पाहणी केली. तसेच येथील झुडूपांमधून पोलिसांनी एक प्लास्टिकची बॅग हस्तगत केली आहे. या बॅगेत काय आहे हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.

श्रद्धा आणि आफताब यांची भेट मुंबईत झाली होती. मात्र, दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केल्याने ते दिल्लीत येऊन राहत होते. दोघेही लिव इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. या काळात श्रद्धाने आफताबच्या मागे लग्नाचा तगादा लावला. पण तो लग्नाला तयार होत नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यात श्रद्धाचा मृत्यू झाला.

श्रद्धाच्या मृत्यूनंतर आफताबने तिच्या शरीराचे 36 तुकडे केले होते. एकूण 18 बॅगेत हे तुकडे भरले होते. त्यानंतर तो रोज रात्री दोन वाजता हे तुकडे जंगलात नेऊन टाकत होता. सहा महिन्यापूर्वी हे हत्याकांड घडले. या हत्याकांडाचे सर्व पुरावेही त्याने या काळात नष्ट केले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.