AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, थेट 5 हजारांनी..

Gold Silver Rate Today : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन लोकांना केले. यासोबतच विदेशात लग्न न करण्याचेही आवाहन केले. त्यातच आता सराफा बाजारात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, थेट 5 हजारांनी..
Gold Silver Rate and pm modi
| Updated on: Sep 01, 2026 | 12:49 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोने खरेदीबाबत मोठे आवाहन केले. गरज नसेल तर सोने खरेदी टाळा, असे त्यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर विदेशातील लग्नही टाळण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. नरेंद्र मोदी सध्या विदेश दाैऱ्यावर आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हे मोठे आवाहन केले. सोने खरेदीबाबत सरकारकडून सातत्याने हे आवाहन केले जात आहे. परदेशी चलनावरील दबाव टाळण्यासाठी सरकार अशी पाऊले उचलत आहे. इंपोर्ट ड्युटी सोन्यावरील कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात सरकार आहे. सोन्यावर 6 टक्के इंपोर्ट ड्युटी होती, लोकांनी सोने खरेदी टाळावे, याकरिता सरकारने ती थेट 15 टक्के केली. मात्र, सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट बेकायदेशीर गोष्टी अधिक घडताना दिसल्याचे सरकारच्या लक्षात आले.

इंपोर्ट ड्युटी सरकारकडून कमी करण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. ज्यामुळे सोन्याचे भाव थेट कमी होऊ शकतात. त्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले. आज 1 सप्टेंबर रोजी MCX वर सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. सोन्याचा दर 310 रूपयांनी घसरला प्रति 10 ग्रॅम 154150 रुपयांवर व्यवहार करत आहे.

आज चांदीच्या दरात घट झाली आहे. चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 5 रुपयांची घसरण होऊन 250 रुपयांवर आला आहे. आता 10 ग्रॅम चांदीचा दर 2500 रुपये आहे, तर 100 ग्रॅम चांदीचा दर 25000 रुपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीच्या दरात 5000 रुपयांची घट होऊन 250000 रुपये झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर चांदी स्वस्त होताना दिसली.

बाजार विश्लेषक टोनी सायकामोर यांच्या हवालानुसार, फेडचे अध्यक्ष केविन वॉर्श यांची कठोर भूमिका आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील वाढता तणाव याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. त्यातच याचा परिणाम सोन्याच्या दरावरही झाली आहेत. सोने पुन्हा स्वस्त होताना दिसत आहेत. चांदीच्या भावातही घसरण नोंदवण्या आली.

Follow Us
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य