कफ सिरप प्यायल्याने सहा लहान मुलांचा मृत्यू, बायोप्सी रिपोर्टमधून काय उघड झाले ?
आपल्या शेजारील राज्यात कफ सिरप प्यायल्याने लहान मुलांच्या किडनीला संसर्ग होऊन त्यांचा किडनी फेल झाल्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात नागपूर येथून आलेल्या अहवालात या मुलांना कफ सिरप दिल्याचे उघडकीस आले आहे.

मध्यप्रदेशातील छींदवाडा जिल्ह्याच्या परासिया भागात सहा लहान मुलांचा कफ सिरप प्यायल्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.आता या संदर्भात नागपूर येथील किडनी बायोप्सी रिपोर्टमध्ये मुलाचा मृत्यूचे कारण टॉक्सिन-सहीत किडनी इंज्युरी सांगितले जात आहे. मृत्यूमुखी पडलेल्या सहा मुलांमध्ये सर्दीचे कफ सिरफ घेतल्याचे उघड झाले होते असे डॉ.पवन इंदुलकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणात एका जुन्या संशोधनात अशा कफ सिरपमध्ये डाय-ईथलीन ग्लायकोल मिसळले असल्याची शक्यता असते, जे किडनीसाठी अतिशय धोकादायक असते.
माहितीनुसार आतापर्यंत गेल्या दहा दिवसात परासिया, उमरेठ, जाटाछापर,बडकुही आणि आजबाजूच्या भागातील मुलांना सर्दी-खोकला आणि तापाचा सामना करावा लागला होता. तेथे स्थानिक डॉक्टरांच्या सूचनेवरुन आणि मेडिकलमधून कुटुंबियांनी कफ सिरप विकत घेऊन ते मुलांना दिले. त्यामुळे काही दिवसात मुलांना लघवी होणे बंद झाले. यानंतर मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती सहा मुलांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत सहा मुले दगावली
यामुळे मध्य प्रदेश जिल्हा प्रशासनाने संशयित पॅरासिटामॉल आणि क्लोरोफीनामाईन कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच डॉक्टरांना आणि पालकांना या संदर्भात सावधानतेची सूचना केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पंधरा प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. चार मुलांना नागपूरात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले आहे. आजही एका मुलाला नागपूर येथे हलवले आहे. जेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुलांच्या मृत्यूनंतर घबराट पसरली आहे. मुलांचे डोळ्या देखत प्राण गेल्याने पालकांनी संताप व्यक्त करत त्यांचे रडरडून हाल झाले आहेत.
काय म्हणाले एक्सपर्ट ?
या मुलांच्या बायोप्सी रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले आहे की या मुलांच्या किडनीत टॉक्सिनमुले इंज्युरी झाली आहे. या आजारी मुलांमध्ये सर्वांनी कोल्ड कफ सिरप घेतल्याचेही उघडकीस आले आहे. या कफ सिरपमध्ये डाय-ईथलीन ग्लायकोलचा वापर झालेला असावा.ज्याने किडनी क्षतिग्रस्त झाली आहे अशी माहिती डॉ.पवन इंदुलकर यांनी दिली आहे.
