AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय जवानांचा सन्मान, ३६ वायू सैनिकांसह १६ बीएसएफ जवानांना वीरता पुरस्कार

ऑपरेशन सिंदूरमध्ये साहस आणि शौर्य दाखवणाऱ्या भारतीय वायू सेनेच्या एकूण ३६ वायूसैनिकांना उद्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने १५ ऑगस्टला वीरता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यात एक शौर्य चक्र, ९ वीर चक्र आणि २६ वायू सेना मेडल ( गॅलेंट्री ) प्रदान केले जाणार आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय जवानांचा सन्मान, ३६ वायू सैनिकांसह १६ बीएसएफ जवानांना वीरता पुरस्कार
operation sindoor
| Updated on: Aug 14, 2025 | 6:45 PM
Share

ऑपरेशन सिंदूरमध्ये साहस आणि पराक्रम दाखवणाऱ्या भारतीय वायू सेनेच्या एकूण ३६ वायू सैनिकांना १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वीरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात विंग कमांडर अभिमन्यू सिंह यांना शौर्य चक्राने गौरवले जाणार आहे. तसेच अन्य ९ जवानांना वीर चक्र पुरस्काराने गौरवले जाणार आहे. यात ४ ग्रुप कॅप्टन, एक विंग कमांडर, तीन स्क्वाड्रन लीडर आणि एका फ्लाईट लेफ्टनंट यांचा समावेश आहे. तर २६ वायू सैनिकांना वायू सेना मेडल ( गॅलेंट्री ) ने सन्मानित केले जाणार आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ लोकांची बळी घेतला होता. त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने मोहिम राबविली होती, ७ ते १० मे दरम्यान राबविलेल्या या मोहिमेत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरात घुसून भारताने ९ अतिरेकी प्रशिक्षण स्थळ उद्धवस्त केले. या ऑपरेशनमध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले. तर सात जवान जखमी झाले.

शौर्य चक्राने सन्मान

– विंग कमांडर अभिमन्यु सिंह

वीर चक्र सन्मान होणारे जवान

– ग्रुप कॅप्टन: आर. एस. सिद्धू, मनीष अरोरा, अनिमेष पाटणी, कुणाल कालरा

– विंग कमांडर: जॉय चंद्रा

– स्कॉड्रन लिडर: सार्थक कुमार, सिद्धांत सिंह, रिझवान मलिक

– फ्लाईट लेफ्टनंट: ए. एस. ठाकुर

सीमा सुरक्षा दलाच्या १६ जवानांचाही गौरव

पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान अद्वितीय वीरता आणि शौर्याचे प्रदर्शन केल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ ) १६ कर्मचाऱ्यांनाही वीरता पदकाने गौरवण्यात येणार आहे. ज्या सैनिकांचा यात गौरव होणार आहे त्यात सब इन्स्पेक्टर व्यास देव, कॉन्स्टेबल सुद्दी राभा, अभिषेक श्रीवास्तव, सहायक , सेनानायक आणि कॉन्स्टेबल भूपेन्द्र बाजपेयी यांचा समावेश आहे.

ऑपरेशन सिंदूर साठी या जवानांना वीरता पदक( जीएम ) जाहीर करण्याची घोषणा केंद्र सरकारने ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली आहे. यातील भारतीय जवानांनी शत्रूचे निगराणी करणारे कॅमेरे नष्ट केले,तर अन्य जवानांनी ड्रोन हल्ल्यांना नाकाम केले.

बीएसएफया निमलष्करी दलाच्या जवानांना देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर सैन्यांच्या परिचालन नियंत्रण अंतर्गत नियंत्रण रेषा ( एलओसी ) शिवाय २,२९० किलोमीटर लांबीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा ( आयबी ) सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

येथे पोस्ट पाहा –

या स्वातंत्र्य दिनी १६ बहादूर सीमा प्रहरींना ( सीमा रक्षक ) ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांच्या अभूर्तपूर्व साहस आणि अद्वितीय पराक्रमासाठी वीरता पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. बीएसएफने सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले की,’ हे पदक भारत की प्रथम रक्षा पंक्ती : सीमा सुरक्षा बलावरील राष्ट्राचा विश्वास आणि भरवशाचा हे प्रमाण आहे’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.