AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 ग्लोबल समिटसाठी जर्मनी सज्ज, आजपासून होणार सुरूवात, पंतप्रधान मोदीही होणार सहभाागी

देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटला आजपासून सुरूवात होणार आहे. जर्मनीतील स्टर्टगार्ड शहरातील ऐतिहासिक MHP एरिना या फुटबॉल मैदानात 21 ते 23 नोव्हेंबर पर्यंत ही समिट पार पडणार आहे. या समिटमध्ये भारत आणि जर्मनीच्या स्थायी विकासाच्या रोडमॅपवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समिटचे मुख्य आकर्षण असणार आहेत.भारत आणि जर्मनीचे संबंध दृढ करण्यासाठी ही समिट अत्यंत महत्त्वाची आहे.

News9 ग्लोबल समिटसाठी जर्मनी सज्ज, आजपासून होणार सुरूवात, पंतप्रधान मोदीही होणार सहभाागी
| Updated on: Nov 21, 2024 | 10:44 AM
Share

देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटला आजपासून जर्मनीत सुरूवात होणार आहे. या महासमिटमध्ये भारत आणि जर्मनीमधील संबंध अधिक मजबूत करण्यासोबतच दोन्ही देशांच्या स्थायी विकासाच्या रोडमॅपवर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधील राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती, दिग्गज खेळाडू आणि कॉर्पोरेट लीडर्स या विचारमंथनात सहभागी होतील. या ग्लोबल समिटचे प्रमुख आकर्षण असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी.

जर्मनीतील स्टर्टगार्ड शहरातील ऐतिहासिक फूटबॉल मैदान MHP एरिनामध्ये 21 ते 23 नोव्हेंबरपर्यंत ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये भारत-जर्मनीतील स्थायी विकासाच्या रोडमॅपवर चर्चा होणार आहे. आज या समिटचा शुभारंभ होणार असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

पहिल्या दिवशी होणार हे सेशन

News9 ग्लोबल समिटच्या जर्मन आवृत्तीच्या प्रारंभानंतर, Tv9 नेटवर्कचे MD आणि CEO बरुण दास, भारत आणि जर्मनी: निरंतर विकासासाठी रोडमॅप या विषयावर त्यांचे विचार मांडतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उद्घाटनपर भाषण करतील. यानंतर दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे संबोधित करतील. पहिल्याच दिवशी, श्रीनगर ते स्टर्टगार्ट : ग्राहक कॉरिडॉर या विषयावर मर्सिडीज-बेंझ (इंडिया)चे सीईओ संतोष अय्यर देखील चर्चा करतील.

महत्वाच्या मुद्यांवर होईल चर्चा

या समिटच्या दुसऱ्या दिवशी Tv9 नेटवर्क चे MD & CEO वरूण दास यांच्या स्वागतपर भाषणानंतर सेशन सुरू होईल. भारत आणि जर्मनीच्या निरंतर आणि शाश्वत विकासाच्या अजेंड्यावर जर्मनीचे खाद्य आणि कृषी मंत्री सेम ओजदेमिर यांचे भाषण होईल. त्याव्यतिरिक्त ग्रीन एनर्जी, एआय, डिजिटल अर्थव्यवस्था , कौशल्य विकास आदी मुद्यांवर दिवसभरात चर्चा होणार आहे. भारत संरक्षण उद्योग आणि आजचे यूनिकॉर्नवर या विषयावरही मंथन होईल.

पंतप्रधान मोदी प्रमुख अतिथि

News9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी पोर्श, मारुती, सुझुकू, मर्सिडिज बेंझ, भारत फोर्सशिवाय भारत आणि जर्मनीचे अनेक व्यासायिक प्रतिष्ठान, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स आणि एसोचेम सारखे व्यापारी संघाचे प्रतिनिधीही या समिटमध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथि आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ते उद्या ( 22 नोव्हेंबर) India: Inside the Global Bright Spot या विषयावर समिटमधील उपस्थितांना संबोधित करतील.

या विषयांवरही होणार चर्चा

21 ते 23 नोव्हेंबर – तीन दिवसांपर्यंत चालणाऱ्या या समिटमध्ये 10 पेक्षा जास्त सेशन्स होणार असून 50 हून अधिक वक्ते त्यामध्ये सहभागी होतील. त्यात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स: ॲडव्हांटेज इंडिया’ या विषयावर टेक महिंद्राचे के हर्षुल असनानी, MHP स्टिफन बॅयर आणि इन्स्टिट्यूट ऑफ अँत्रोपोमेटिक्सचे डॉ. जान नीह्यूस संबोधित करणार आहेत, मायक्रोन इंडियाचे आनंद राममूर्ती चर्चा करतील. तर Bridging the Skill Gap: Crafting a Win-Win? या विषयावर क्वेस कॉर्पचे अजित इसाक, पीपल स्ट्राँगचे पंकज बंसल, डॉ. फ्लोरियन स्टॅगमन, फिंटिबाचे जोनास मार्ग्राफ सुद्धा आपले विचार मांडतील. Developed vs Developing: The Green Dilemma या विषयावर आंतरराष्ट्रीय सौरचे अजय माथुर, टीआरआयच्या डॉ. विभा धवन, हिरो फ्यूचर एनर्जीजचे राहुल मुंजाळ, फ्रॉनहोफर आयएसईचे प्रोफेसर एंड्रियास बेट, हेप सोलरचे डॉ. ज्यूलियन होशचर्फ आणि प्रीजीरोचे पीटर हार्टमॅन संबोधित करणार आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.