Stampede : करुर ते कुंभ व्हाया सातारा, साल 2003 पासून 1500 जीव गेले, गर्दीचे बळी थांबणार कधी ?
तामिळनाडूच्या करुर येथे अभिनेता विजय याला पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी होऊन ३९ जणांचे जीव गेले आहेत.गर्दीचे व्यवस्थापन चुकल्याने देशात आणखी एक अपघात घडला आहे. साल २०२५ देशावर संकटाचे वर्षे असल्याचे सिद्ध होत आहे.

देशात पुन्हा एकदा चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत.ताजी घटना तामिळनाडू येथील करुर येथे तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याने ३९ जणांचे बळी गेले आहेत. यात नेहमी प्रमाण महिला आणि लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यात पुन्हा एकदा मोठे अपयश आल्याचे पहायला मिळत आहे. साल २०२५ हे संकटाचे वर्षे ठरले आहे. याच साल २०२५ कुंभमेळा, मंदिर, धार्मिक कार्यक्रम, रेल्वे स्थानक, क्रिकेट टीमचा जल्लोष यात गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन अनेकांचे बळी गेले आहेत. श्रद्धा आणि उत्साहाच्या या क्षणानंतर या घटनांमध्ये लागलीच येथे मातम सुरु झाले. आतापर्यंत गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन साल २००३ पासून १५०० जणांचे बळी गेले आहेत. ...
