AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना निमंत्रण, 2 फेब्रुवारीला होणार भव्य सोहळा

रामानुज संप्रदायाचे विद्यमान आध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही आज निमंत्रण दिलं.

'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'च्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना निमंत्रण, 2 फेब्रुवारीला होणार भव्य सोहळा
चिन्ना जियार स्वामी यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना निमंत्रण
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 9:12 PM
Share

नवी दिल्ली : श्री रामानुजाचार्य स्वामींच्या (Sri Ramanujacharya Swami) 1000 व्या जन्म वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामानुज सहस्रब्दी’ (Sri Ramanuja Sahasrabdi) समारंभांचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही 13 दिवसीय सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय. त्यानंतर आता रामानुज संप्रदायाचे विद्यमान आध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही आज निमंत्रण दिलं. (Chinna Jiyar Swamy Invites Mohan Bhagwat and Rajnath Singh for Inauguration of Statue of Equality)

रामानुज संप्रदायाचे विद्यमान आध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांच्यासह श्रीनिवास रामानुजम आणि माई होमचे चेअरमन डॉ. रामेश्वर राम यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्याचबरोबर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

Chinna Jiyar Swami and Mohan Bhagwat 1

चिन्ना जियार स्वामी यांच्याकडून मोहन भागवत यांना निमंत्रण

श्री रामानुजाचार्य स्वामी यांची 216 फुटी भव्य प्रतिमा

श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या आठवणी जागवण्यासाठी आणि सन्मानासाठी मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबादजवळ शमशाबादमध्ये निर्मित एका मोठा आश्रमात त्यांच्या प्रतिमेच्या अभिषेकासह 1000 व्या वार्षीक सोहळ्याला सुरुवात होईल. स्वामींची 216 फूट उंच प्रतिमा बनवण्यात आली आहे, जी जगातील दुसरी सर्वाच उंच प्रतिमा आहे. रामानुजाचार्यांच्या सर्व भक्तांची आपल्या देवतांची पूजा करण्याच्या अधिकारांची रक्षा करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं संबोधलं जात आहे.

लोककल्याणासाठी महायज्ञाचं आयोजन

सहस्रहुंदात्माका लक्ष्मी नारायण यज्ञ लोककल्याणासाठी केला जाणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी बांधण्यात आलेल्या 1,035 होम कुंडांमध्ये सुमारे दोन लाख किलो गाईचे तूप वापरण्यात येणार आहे. मुचिंतल येथील विस्तीर्ण आध्यात्मिक सुविधा “दिव्य साकेत” लवकरच जगप्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण म्हणून उदयास येईल. हे चिन्ना जीयर यांचे स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करून हा मेगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुतळ्याच्या बांधकामात 1800 टन लोखंड वापरला आहे. तर उद्यानाभोवती 108 दिव्यदेश किंवा मंदिरे बांधलेली आहेत.

त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांच्यासह श्रीनिवास रामानुजम आणि माई होमचे चेअरमन डॉ. रामेश्वर राम राजनाथ सिहांच्या भेटीला

कोण आहेत रामानुजाचार्य?

रामानुजाचार्य यांचा जन्म 1017 मध्ये तमिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे कांतीमाती आणि केसावाचार्युलू यांच्याकडे झाला. भक्तांचा असा विश्वास आहे की हा अवतार स्वतः देवाच्या आदेशानं घेतला आहे. त्यांचे शिक्षण कांची अद्वैत पंडितांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत मध्ये झालं. त्यांनी विशिष्ठद्वैत विचारधारा स्पष्ट केली आणि मंदिरांना धर्माचे केंद्र बनवले. रामानुजांना यमुनाचार्यांनी वैष्णव दीक्षामध्ये प्रवेश दिला. त्यांचे आजोबा अलावंदरू हे श्रीरंगम वैष्णव मठाचे धर्मगुरू होते. ‘नंबी’ नारायणाने रामानुजाला मंत्र दीक्षाचा उपदेश केला. तिरुकोष्टियारूंनी ‘द्वैय मंत्रा’चे महत्त्व समजावून सांगितले आणि रामानुजम यांना मंत्राचं गुपीत राखण्यास सांगितलं. रामानुजाला वाटले की ‘मोक्ष’ हा काही लोकांपुरता मर्यादित राहू नये. त्यामुळे तो पुरुष आणि स्त्रियांना सारख्याच पवित्र मंत्राची घोषणा करण्यासाठी श्रीरंगम मंदिर गोपुरम वर चढला.

रामानुजाचार्य स्वामी यांनी दलित लोकांना उच्चभ्रूंच्या बरोबरीने वागले. त्यांनी समाजात अस्तित्वात असलेल्या अस्पृश्यता आणि इतर दुर्गुणांचा नायनाट केला. त्यांनी प्रत्येकाला देवाची उपासना करण्याचा समान विशेषाधिकार दिला. अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना त्यांनी “तिरुकुलाथर” असं संबोधलं. याचा अर्थ “जन्माला आलेला देव” आणि त्यांना मंदिराच्या आत नेले. त्यांनी भक्ती चळवळीचे नेतृत्व केले तसंच तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला.

इतर बातम्या :

सीमकार्ड घेण्यापासून ते मोबाईल टॉवर लावणं आता सोपं, टेलिकॉम कंपन्यांसाठी केंद्राकडून मोठ्या पॅकेजची घोषणा

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचं काम कधी पूर्ण होणार? नितीन गडकरींकडून हरियाणा, राजस्थानात कामाची पाहणी

Chinna Jiyar Swamy Invites Mohan Bhagwat and Rajnath Singh for Inauguration of Statue of Equality

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.