Boy Suicide: सनदी अधिकाऱ्याच्या मुलाची सहाव्या माजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, घरी कुणी नसताना मुलाने उचलले टोकाचे पाऊल

स्थानिक पोलिसांची क्राईम टीम तसेच न्यायवैद्यक पथकाने (एफएसएल टीम) घटनास्थळाची पाहणी केली आहे. मुलाने कोणत्या कारणामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

Boy Suicide: सनदी अधिकाऱ्याच्या मुलाची सहाव्या माजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, घरी कुणी नसताना मुलाने उचलले टोकाचे पाऊल
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 8:07 PM

नवी दिल्ली : चेन्नईतील विद्यार्थिनीने लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत स्वतःचे जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आता राजधानी नवी दिल्लीमध्ये आणखी एका अल्पवयीन मुलाच्या आत्महत्येची घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या 15 वर्षांच्या मुलाचे वडील सनदी अधिकारी असून त्याने राहत्या घराच्या इमारतीतील सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपवले. त्याच्या घटनेने राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे.

दिल्ली सीडब्ल्यूजी परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जेव्हा मुलाने हे भयानक पाऊल उचलले, त्यावेळी त्याचे आई-वडील मयूर विहार मार्केटमध्ये गेले होते. आत्महत्या करणारा मुलगा घरी एकटाच होता. घटनेनंतर शेजाऱ्यांनी त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपचारानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडल्याचे उघडकीस आली.

पोलिसांच्या माहितीनुसार मुलगा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता

स्थानिक पोलिसांची क्राईम टीम तसेच न्यायवैद्यक पथकाने (एफएसएल टीम) घटनास्थळाची पाहणी केली आहे. मुलाने कोणत्या कारणामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत कुठलाही गैरप्रकार झाल्याची भीती नसून पुढील तपास सुरू आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा मुलगा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. गेल्या सप्टेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

किरकोळ कारणांवरून टोकाचे पाऊल; घटनांमध्ये वाढ

अलीकडच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या कारणांमुळे तरुणांनी टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना चेन्नईच्या बाहेरील भागात घडली. या मुलीने लिहिलेली सुसाईड नोट खूपच भावूक होती. तिच्या आत्महत्येने तरुण मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणांवरून टोकाचे पाऊल उचलण्याच्या मुलांच्या मानसिकतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. मुलांचे मानसिक संतुलन नीट ठेवण्याच्या दृष्टीने पालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

चेन्नईतील मुलीची भावनिक सुसाईड नोट

चेन्नईतील आत्महत्या करणाऱ्या मुलीची सुसाईड नोट फार भावनिक होती. तिने मुलींच्या सुरक्षेच्या ज्वलंत प्रश्नावर परखड शब्दांत भाष्य केले. त्यामुळे तिची सुसाईड नोट देशभर प्रचंड गाजली. सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले होते, ‘ना शिक्षकांवर विश्वास ठेवू शकत, ना नातेवाईकांवर… आता मुलींसाठी फक्त आईचा गर्भ आणि स्मशानभूमीच सुरक्षित आहे’. तिने या सुसाईड नोटची सुरुवात ‘Stop Sexual Harrasment’ या शब्दांनी केली होती. मी आता सहन करू शकत नाही, असे त्या मुलीने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. (Suicide of a minor by jumping from a building for unknown reasons)

इतर बातम्या

Rajasthan Crime : घरमालकाला ‘हनीट्रॅप’मध्ये फसवले; तीन महिलांसह चौघांना अटक

Mahim Crime: माहीम येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.