AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी गुन्हेगार असेल तरी घरावर बुलडोझर चालवता येणार नाही… सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

bulldozer action: जमीयत उलेमा ए हिन्द या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संघटनेने राज्य सरकारकडून मनाप्रमाणे घरांवर बुलडोझर चालवले जात असल्याचा आरोप केला. याचिकेत या संघटनेने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील उदाहरणे दिली.

कोणी गुन्हेगार असेल तरी घरावर बुलडोझर चालवता येणार नाही... सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
bulldozer action
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 02, 2024 | 2:59 PM
Share

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात काही गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले. आरोपींना धडा शिकवण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यात आले. सरकारच्या या निर्णयाविरोधात जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केली आहे. कोणी गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असे न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथन यांनी म्हटले आहे. या प्रकरणात सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

गुन्हेगार नाही, अवैध बांधकामांवर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारांवर करण्यात येणाऱ्या बुलडोझर कारवाईसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ गुन्हेगार असल्यामुळे कोणाचे घर पाडता येणार नाही. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले की, गुन्हा सिद्ध झाला तरी घर पाडता येत नाही. परंतु ज्या कारवाया झाल्या आहेत, त्या अवैध निर्मितीच्या आहेत. ते गुन्हेगार आहेत, म्हणून कारवाई केली गेली नाही.

जमीयत उलेमा ए हिंदकडून याचिका

जमीयत उलेमा ए हिन्द या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संघटनेने राज्य सरकारकडून मनाप्रमाणे घरांवर बुलडोझर चालवले जात असल्याचा आरोप केला. याचिकेत या संघटनेने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील उदाहरणे दिली. या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला लक्ष केले जात असल्याचा आरोप या संघटनेने केला. ही याचिका वकील फरुख रशीद यांनी दाखल केली.

याचिकेवर सुनावणीची मागणी

वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, राज्य सरकार अल्पसंख्याकांना लक्ष करुन त्यांची घरे बुलडोझरने उद्ध्वस्त करत आहेत. त्या व्यक्तींना कायदेशीर प्रक्रिया करण्याची कोणतीही संधी राज्य सरकार देत नाही. कोर्टाने म्हटले की, अवैध बांधकामांना संरक्षण दिले जाऊ शकत नाही. संपूर्ण देशात यासंदर्भात एक प्रणाली निश्चित करण्यासाठी कोर्टाने सूचनाही मागितल्या.

हे ही वाचा…

कोण आहे हाजी शहजाद, ज्याच्या 20 कोटींचा महल अन् आलिशान गाड्यांवर चालवले बुलडोजर

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?