तर कराची-लाहोरमध्ये दुपारी 12 वाजताच सूर्यास्त, झटक्यात पाकिस्तानात घुसून…; भारताकडे आलं सर्वात डेंजर शस्त्र
प्रजासत्ताक दिनी भारताच्या स्वदेशी सूर्यास्त्र रॉकेट प्रणालीचे अनावरण झाले. हे मल्टी कॅलिबर, लाँग रेंज रॉकेट 300 किमीपर्यंत अचूक मारा करते. पाकिस्तानच्या कराची-लाहोरसारख्या शहरांना लक्ष्य करण्याची याची क्षमता भारताचे डीप-स्ट्राइक सामर्थ्य दर्शवते. संरक्षण तज्ञांनुसार, हे भारताच्या नवीन लष्करी आत्मविश्वासाचे आणि आक्रमक रणनीतीचे प्रतीक आहे, ज्यामुळे पाकिस्तानला स्पष्ट संदेश मिळाला आहे.

आज देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. आजच देशाला संविधान मिळालं होतं. याच दिवसापासून देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आली होती. आज आपली लोकशाहीही 77 वर्षाची होत आहे. या निमित्ताने राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या परेडमध्ये भारताने देशाची सांस्कृतिकता दाखवतानाच देशाची महाशक्तीही दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शत्रू राष्ट्रांना धडकी भरेल असे मिसाईलही कर्तव्य पथावर दाखवण्यात आले आहेत. भारताचं पहिलं स्वदेशी मल्टी कॅलिबर लाँग रेंज रॉकेट लॉन्चर सिस्टिम सूर्यास्त्रची पहिली झलकही कर्तव्य पथावर दाखवण्यात आली आहे. 300 किलोमीटरपर्यंत जाण्याची क्षमता असलेल्या या सूर्यास्त्राच्या एका माऱ्याने पाकिस्तानच्या लाहोर आणि कराचीत दुपारी 12 वाजताच अंधार दाटून येईल इतका विद्ध्वंस घडून आणण्याची क्षमता यात आहे. सूर्यास्त्र रॉकेट हे भारताच्या डीप स्ट्राइक डिटरेन्सच्या नव्या रणनीतीचं प्रतिक आहे. त्याच्या एका माऱ्याने पाकिस्तान उभा पेटू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
सूर्यास्त्र भारताचा पहिला मेड इन इंडिया, मल्टी कॅलिबर, लॉंग रेंज रॉकेट लॉन्चर सिस्टिम आहे. पुण्यातील NIBE लिमिटेडने इस्रायलच्या एल्बिट सिस्टिम्सच्या साथीने सूर्यास्त्र विकसित करण्यात आला आहे. तो एल्बिटच्या PULS (Precise & Universal Launching System) आर्किटेक्चरवर आधारीत आहे. तो150 किलोमीटर आणि 300 किलोमीटर पर्यंत अत्यंत अचूक निशाणा साधून मोठा हल्ला करू शकतो.
सर्वात मोठी ताकद
टेस्टिंगमध्ये सूर्यास्त्रने पाच किलोमीटरपेक्षाही कमी सर्कुलर एरर प्रोबेबल CEP) ची अचूकता दाखवली आहे. शत्रूंचे एअरबेस, रडार, कमांड सेंटर आणि मिसाईलच्या अड्ड्यांसाठी ते घातक मानलं जातं. एवढेच नव्हे तर ही सिस्टिम 100 किलोमीटरपर्यंत लोइटरिंग म्यूनिशनही डागू शकते. सूर्यास्त्रची सर्वात मोठी ताकद त्याच्या मल्टी कॅलिबर क्षमतेत आहे. एकाच लॉन्चरने वेगवेगवेगळ्या प्रकारचे रॉकेट आणि गाइडेड म्यूनिशेन डागू शकतं. त्यामुळे ऑपरेशनमध्ये लवचिकता येते आणि लॉजिस्टिक बोझ कमी होतो. ही सिस्टीम BEML च्या हाय मोबिलिटी व्हेईकल (HMV) वर लावण्यात आली आहे. त्यामुळे अत्यंत वेगाने तो जागा बदलू शकतो.
कराची, लाहोर, रावळपिंडी रडारवर?
संरक्षण तज्ज्ञांच्या मते सूर्यास्त्रमुळे भारताच्या डीप-स्ट्राइक क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. कराची, लाहोर, रावळपिंडीसारखी पाकिस्तानची मोठी शहरे आता भारताच्या थेट आवाक्यात आली आहेत. सूर्यास्त्राच्या एका हल्ल्याने दुपारी 12 वाजताही शत्रूच्या आकाशात ‘सूर्य मावळू’ शकतो.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सूर्यास्त्रासोबतच ब्रह्मोस, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, MRSAM, ATAGS, धनुष तोफ, शक्तीबाण यांसारखी अनेक आधुनिक शस्त्रेही दाखवली जाणार आहेत. तसेच चार झान्स्कर पोनी, दोन बॅक्ट्रियन उंट, शिकारी पक्षी आणि लष्करी कुत्रेही प्रथमच दिसणार आहेत.
आज कर्तव्य पथावर सूर्यास्त्राची झलक दिसली. यावेळी ते केवळ एक शस्त्र नव्हते, तर भारताच्या नव्या लष्करी सामर्थ्याचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून अधोरेखित झाले. ही प्रणाली केवळ दूरवरून शत्रूवर प्रहार करण्याची क्षमता देत नाही, तर भारतीय सैन्याची मोबिलिटी आणि लवचिकताही वाढवते. तज्ज्ञांच्या मते सूर्यास्त्रमुळे भारताची रणनीतिक खोली मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे. पाकिस्तानसाठी हा एक मोठा संदेश आहे की आता भारत फक्त संरक्षणात्मक नाही, तर आक्रमक डीप-स्ट्राइक क्षमतेतही पारंगत झाला आहे.
