तंत्रज्ञानाचा परिणाम मजूरांवर पडू नये…भारतीय मजदूर संघाच्या स्थापना दिनी काय म्हणाले संघ प्रमुख ?
भारतीय मजदूर संघाचा आपला ७० वा वर्धापन दिन साजरा करत आहे, या निमित्त आयोजित सोहळ्यात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी प्रमुख पाहूणे म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी मजूराच्या व्यथांवर चिंता व्यक्त केली आणि तंत्रज्ञानाने श्रमिकांच्या जीवनावर पडणाऱ्या प्रभावावरही विचार करायला हवा असे म्हटले आहे.

भारतीय मजदूर संघाने आज आपल्या स्थापनेची ७० वर्षे पूर्ण केली आहेत. या संदर्भात बुधवारी दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत हे उपस्थित होते. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी मजूरांचे दु:ख हे समाजाचे दु:ख असल्याचे प्रतिपादन केले.
मोहन भागवत यावेळी म्हणाले की तंत्रज्ञान मानवी स्वभावाला रुक्ष बनवत आणि कष्टाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. तंत्रज्ञानाने श्रमिक जीवनावर परिणाम होऊ नये याचा विचार करायला हवे. ते म्हणाले की भारतीय मजदूर संघाला मोठे बनवायचं आहे. देशाच्या वातावरणात परिवर्तन आणणे आपले काम आहे. जगातील वातावरणात बदल आणणे हे आपले काम आहे.
ते म्हणाले की संघटनेची प्रतिष्ठा वाढली की संघटना यशस्वी होते, कार्यकर्त्यांचा मान वाढतो. मजदूर संघाने केवळ आपला झेंडा उभा करण्यासाठी नव्हे तर श्रमिकांसाठी काम करण्यासाठी संघटना निर्माण केली आहे.
काय म्हणाले संघ प्रमुख मोहन भागवत?
मोहन भागवत यावेळी म्हणाले की संघटना जेव्हा छोटी होती त्यावेळी ती काही लोकांच्या कल्पनेतच होती. त्यामुळे मनात देखील कोणत्याही स्पर्धेचा भाव नव्हता. मजूरांचे दु:ख करण्यासाठी निघालेले लोक जर कुटुंबाच्या बाता करु लागले तर टीकणार कसे ? त्याकाळी सर्वांचे असेच मानने होते. तरी अनेक लोकांचा त्याग परिश्रम आणि संघर्षानंतर आज ७० वर्षांनंतर आम्ही लोक जगातील महत्वपूर्ण आणि देशातील सर्वप्रथम मजदूर संघटन बनलो. पुढेही काम करायचे आहे, तर जरा पाठी वळून पाहाण्याचीही गरज आहे असेही ते म्हणाले.
भारतीय मजदूर संघाचा प्रवास २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथून सुरु झाला होता. २३ जुलै रोजी भारतीय मजदूर संघ आपला ७० वा स्थापना दिवस साजरा करत आहे. भारतीय मजदूर संघाने आपली भूमिका केवळ एवढ्यापर्यंतच मर्यादित राखलेली नाही. त्या ऐवजी समाज आणि विश्व कल्याणाचे व्यापक उपाय उदा. पर्यावरण, सामाजिक समरसता तसेच स्वदेशी हे देखील संघटनेचे प्रमुख लक्ष्यांपैकी एक आहेत.
