AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan War : काल रात्रीच्या भारताच्या तीन हिरोंबद्दल जाणून घ्या, पाकिस्तानची सगळी हेकडी उतरवली

India-Pakistan War : पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले.

India-Pakistan War : काल रात्रीच्या भारताच्या तीन हिरोंबद्दल जाणून घ्या, पाकिस्तानची सगळी हेकडी उतरवली
Zu 23mm
| Updated on: May 09, 2025 | 2:22 PM
Share

जास्त युद्धाची खुमखुमी दाखवणाऱ्या पाकिस्तानचा माज भारताने उतरवला आहे. भारत आणि पाकिस्तान तणाव टिपेला पोहोचला आहे. भारताच्या जोरदार प्रहाराने पाकिस्तानची सगळी हेकडी उतरली आहे. भारताने पाकिस्तानचे दोन JF- 17 आणि एक F-16 फायटर विमान पाडलं आहे. त्याशिवाय पाकिस्तानी सैन्याची अनेक एअर डिफेन्स युनिटही उद्धवस्त केली आहेत. पाकिस्तानचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळून लावला आहे. पाकिस्तानी मिसाईल्स आणि रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात आली आहेत.

L – 70

काल रात्री पाकिस्तानने नियंत्रण रेषेसह आंतरराष्ट्रीय बॉर्डर व अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन्सने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोट क्षेत्रात भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स सिस्टिमने काऊंटर ड्रोन ऑपरेशन करुन पाकिस्तानचे 50 पेक्षा जास्त ड्रोन्स पाडले. भारताने एस-400, एल-70 अँटी-एअरक्राफ्ट गन आणि सोवियत वंशाची ZSU-23-4 शिल्का यूनिट्ससह ड्रोन विरोधी आणि कमी उंचीवरुन उडणाऱ्या टार्गेटसना लक्ष्य करणारी एअर डिफेंस सिस्टमची पुरी सीरीज तैनात आहे. त्याशिवाय अन्य एडवान्स काऊटर-यूएएस इक्विपमेंटचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. हवाई हल्ले कसे परतवून लावायचे ते सैन्याच्या मजबूत क्षमतेच प्रदर्शन झालं.

S-400

भारत-पाकिस्तान सीमेवर तैनता असलेल्या S-400 सिस्टिमने पाकिस्तानच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळवल्या. पाकिस्तानने गुरुवारी जम्मू स्थित एअरस्ट्रिपवर रॉकेट डागले. भारतीय सैन्याची सतर्कता आणि मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमने हे हल्ले परतवून लावले. भारतीय सैन्याच्या अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने तात्काळ कारवाई केली. पाकिस्तानने डागलेलली 8 मिसाईल्स हवेतच नष्ट केली. या मिसाईल्सच टार्गेट जम्मू एअरस्ट्रिप होती. पण त्यांचा इरादा यशस्वी होऊ शकला नाही.

INS विक्रांत

भारताची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतने समुद्रात आपली ताकद दाखवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत तणाव वाढला. त्यावेळी भारतीय नौदलाने आधीच INS विक्रांतला समुद्रात तैनात केलं होतं. स्ट्राइक ग्रुपच्या या विमानवाहू युद्धनौकेसोबत फ्रिगेट, पाणबुडी विरोधी युद्धनौका आणि सहाय्यक जहाजं आहेत. भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी मिळून पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने मोठे हल्ले केले. भारताने प्रत्येक हल्ला यशस्वीरित्य परतवून लावला.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.