AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली स्फोट प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, दहशतवादी उमरच्या डीएनए चाचणीचा खळबळ उडवणारा रिपोर्ट…

राजधानी दिल्ली येथे झालेल्या स्फोटानंतर देशात एकच खळबळ उडाली. या स्फोटाचे धागेदोर थेट पुलवामापर्यंत जाऊन पोहोचले. आता या स्फोटाबद्दल धक्कादायक अशी माहिती पुढे आल्याचे बघायला मिळाले.

दिल्ली स्फोट प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, दहशतवादी उमरच्या डीएनए चाचणीचा खळबळ उडवणारा रिपोर्ट...
Terrorist Umar Nabi alias Umar Mohammed
| Updated on: Nov 13, 2025 | 7:31 AM
Share

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबरच्या सायंकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा जीव गेला तर 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. i-20 कारमध्ये या स्फोट झाला. थेट जम्मू काश्मीरच्या पुलवामापर्यंत या स्फोटाचे कनेक्शन जाऊन पोहोचले. हा स्फोट घाई घाईत झालेला स्फोट असून खरा कट तर वेगळाच होता तपासात स्पष्ट झाले. हैराण करणारी बाब म्हणजे कटाची योजना आखणारे जवळपास सर्व डॉक्टर. आता दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल एक अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसतंय. बुधवारी रात्री उशिरा पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने पुष्टी केली आहे की, स्फोटकांनी भरलेल्या ह्युंदाई i-20 कारमध्ये उपस्थित असलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून दहशतवादी डॉक्टर उमर नबी ऊर्फ उमर मोहम्मद हाच होता.

गाडीच्या ढिगाऱ्यातून सापडलेल्या मृतदेहाच्या डीएनए चाचणीत उमरच्या कुटुंबातील सदस्स्यांचे नमुनने 100 टक्के जुळली आहेत. यामुळे आता हे स्पष्ट झाले की, दहशतवादी उमर हाच स्फोटके भरलेली गाडी चालवत होता. अनेक सीसीटीव्हींमध्येही उमर दिसत होता. मात्र, त्याने तोंडाला मास्क लावल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. आता डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले की, गाडीच्या ढिगाऱ्यात सापडलेला मृतदेह हा उमरचाच आहे.

सुरूवातीपासूनच्या तपासात उमर हाच टार्गेटवर होता. कारण उमरने स्फोटाच्या 11 दिवस अगोदरच ही कार खरेदी केली होती. उमर हा फरिदाबादच्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा एक प्रमुख सदस्य होता आणि तो फरार होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर तो सतत आपली ठिकाणे बदल होता. डॉ. उमर हाच कारमध्ये असल्याचे आता स्पष्ट झालंय. उमरच्या आई आणि भावाने डीएनए नमुने दिले होते, जे स्फोटात वापरल्या गेलेल्या कारच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या हाडे, दात यांच्याशी 100 टक्के जुळले.

सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, उमरने घाईगडबडीत आणि भीतीने कारसोबत स्वत:ला उडवून दिले. उमर कट्टरपंथी असल्याचे कुटुंबाला आधीच माहित होते. मात्र, त्यांनी याबद्दलची माहिती सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली नाही. उमर हा तुर्कीतील अंकारा येथील हॅंडलरसोबत एका अॅपच्या मदतीने संपर्कात होता. 2022 मध्ये काही लोक भारतातून अंकाराला गेले होते. तिथेच त्यांची माथी भडकवण्यात आली.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.