‘रामाला नाही, रावणाला दाढी होती, तुझ्या दाढीला आग लावणार’, ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार

"कोणाच काय जळतय हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीची लंका जळतेय. तम्ही जिथे गेलाय, त्यांचीच लंका जळणार. विचार चोरुन मिळत नसतात. सध्या चोरटे, भामटे यांच राज्य आहे. डायलॉगबाजी सांगू नका. आम्ही बाळासाहेबांच्या तालिमीत तयार झालो आहोत"

'रामाला नाही, रावणाला दाढी होती, तुझ्या दाढीला आग लावणार', ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार
CM Eknath Shinde
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 10:07 AM

नवी दिल्ली : “मुस्लिम नेते, कार्यकर्ते आम्हाला येऊन सांगत आहेत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमच हिंदुत्व हे घरात चूल पेटवणार हिंदुत्व आहे, भाजपाच हिंदूत्व हे घर जाळणार हिंदूत्व आहे. देशात जाती-धर्माच्या आधारावर नाही, तर रामासोबत कामही मिळाल पाहिजे. रोजगाराची चूल पेटली पाहिजे. आम्ही या देशाचा पाकिस्तान-इराण होऊ देणार नाही” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “देशात भाजपाशिवाय दुसरा कुठला पक्ष राहू नये, या दिशेने निवडणूक आयोग काम करतोय” असं संजय राऊत म्हणाले.

‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “लंका त्यांचीच आहे, आम्ही हुनमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना रामायण, महाभारात वाचाव लागेल” यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राला सुस्कृंत मुख्यमंत्री मिळाले आहेत. साहित्य, कला, काव्य यामध्ये ते रमायचे असं संजय राऊत म्हणाले.

‘तुझी दाढी दिल्लीच्या हातात’

“कोणाच काय जळतय हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीची लंका जळतेय. तम्ही जिथे गेलाय, त्यांचीच लंका जळणार. विचार चोरुन मिळत नसतात. सध्या चोरटे, भामटे यांच राज्य आहे. डायलॉगबाजी सांगू नका. आम्ही बाळासाहेबांच्या तालिमीत तयार झालो आहोत. त्यामुळे आम्हाला डायलॉग येतात” असं संजय राऊत म्हणाले. “तुझी दाढी दिल्लीच्या हातात आहे. दिल्लीला वाटेल, तेव्हा दाढी खेचून तुला बोलवतात. रावणाची लंका होती. महाराष्ट्रात पंचवटीला रामाच वास्तव्य होतं. तुझ्या दाढीला आग लावणार” असं संजय राऊत म्हणाले.

लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार की….

“आज मी मुद्दामून त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही. त्यांना गॅप दिलेली आहे, विश्रांती दिली आहे. जरा घाबरले आहेत, अस्वस्थ आहेत. त्यांना झोप येत नाही. कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत की अमित शाह यांना देखील विचार करावा लागेल मी काय माणूस नेमला आहे” असं संजय राऊत म्हणाले.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.