AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा मोठा गेम, थलपती विजय यांचा मोठा धक्का, मुख्यमंत्री होताच केली सर्वात मोठी घोषणा

थलपती विजय यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांनी आपला मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राहुल गांधींसमोरच त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा मोठा गेम, थलपती विजय यांचा मोठा धक्का, मुख्यमंत्री होताच केली सर्वात मोठी घोषणा
thalapathy vijayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 4:25 PM
Share

तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालात यावेळी पहिल्यांदाच मोठा उलटफेर पहायला मिळाला. गेली अनेक दशकं तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच पक्षांची अलटू पालूट सत्ता होती. कधी डीएमके सत्तेत असायचं तर कधी एआयएडीएमके. मात्र यावेळी थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं या दोन्ही प्रस्तापीत पक्षांना चांगलाच धोबीपछाड दिला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या टीव्हीकेला सर्वाधिक 108 जागा मिळाल्या, त्यानंतर थलपती विजय यांनी काँग्रेस आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षाच्या पाठिंब्यावर बहुमताचं गणित जळवून आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथग्रहण सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच मोठी घोषणा केली आहे.

थलपती विजय यांची ही घोषणा टीव्हीकेच्या मित्र पक्षांसोबतच विरोधी पक्षांना देखील स्पष्ट इशारा मानली जात आहे. या शपथसोहळ्याला राहुल गांधी यांची देखील उपस्थिती होती, त्यांच्यासमोरच थलपती विजय यांनी मोठी घोषणा केली आहे. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणामध्ये स्पष्ट केलं आहे की, तामिळनाडूमध्ये आता सत्तेच केवळ एकच केंद्र असणार आहे, आणि ते म्हणजे मी स्वत: असं थलपती विजय यांनी म्हटलं आहे. थलपती विजय यांची ही घोषणा काँग्रेससह टीव्हीकेच्या सर्व मित्र पक्षांसाठी तसचे विरोधी पक्षांसाठी विजय यांचा स्पष्ट संदेश असल्याचं मानलं जात आहे.

नेमकं काय म्हटलं थलपती विजय यांनी?

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर थलपती विजय यांनी मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडूमध्ये आता सत्तेच दुसरं कोणतंच पावर सेंटर नसेल, सत्तेचं फक्त केवळ एकमात्र केंद्र असेल ते म्हणजे फक्त मी थलपती विजय असं तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. विजय यांनी आपल्या भाषणामध्ये स्वत:ला तामिळनाडूचा छोटा भाऊ ‘थम्बी’ असं म्हटलं आहे. सरकारवर कोणत्याही सहकारी पक्षाचा दबाव चालणार नाही, असंही यावेळी थलपती विजय यांनी म्हटलं आहे. तसेच मी राज्यात काही चुकीचं होऊ देणार नाही, आणि कोणी चुकीचं करत असेल तर ते देखील सहन करणार नाही असं म्हणत त्यांनी यावेळी आपल्या विरोधकांना देखील धक्का दिला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?