‘माझी पत्नी परपुरुषासोबत हॉटेलात….,’ कोर्टाने द्रौपदीचे नाव घेतले याचिका निकाली काढले
दिल्ली हायकोर्टाच्या जस्टीस नीना बंसल कृष्णा म्हणाल्या की महिलेला पतीची संपत्ती मानणे आणि त्याच्या परिणामामुळे घडलेले विनाशकारी महाभारत सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे....

दिल्ली हायकोर्टाने महाभारताच्या द्रौपदीचे उदाहरण देऊन व्याभिचाराच्या प्रकरणात आरोपीला निर्दोष सोडले आहे. कोर्टाने सांगितले की महीलेला पतीची संपत्ती मानणेच मुळी चुकीचे आहे. ज्यामुळे विनाशकारी महाभारत घडले. कोर्टाने कलम ४९७ ला घटनाबाह्य घोषणीत करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा देखील उल्लेख केला. पतीने एका युवकावर त्याच्या पत्नीशी व्याभिचार केल्याचा आरोप होता. परंतू कोर्टाने सुनावणीत द्रौपदीच्या नावाचा उल्लेख केला आणि खटलाच निकाली काढला.
दिल्ली हायकोर्टाने महाभारतातील द्रौपदीचे उदाहरण देत एका प्रकरणाचा निपटाला केला आहे. वास्तविक महिलेच्या पतीने आरोप केला होता की त्याची पत्नीच्या प्रेमीने हॉटेलमध्ये पत्नीशी व्याभीचार केला होता. हायकोर्टाने या प्रकरणाचा सुनावणी करताना या व्यक्तीला निर्दोष सोडले. जस्टीस नीना बंसल कृष्णा म्हणाल्या की महिलेला पतीची संपत्ती मानणे आणि त्याच्या परिणामामुळे घडलेले विनाशकारी महाभारत सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे.
हायकोर्टात काय झाले
द्रौपदीने नीना बंसल कृष्णा म्हणाल्या की द्रौपदीला कोणी दुसऱ्याने नव्हे तर तिच्या पती युधीष्ठीरनेच जुगारात लावले होते. अन्य चार भाऊ मुकदर्शक बनले.आणि द्रौपदीजवळ आपल्या संरक्षणासाठी आवाज उठवण्याची देखील धैर्य नव्हते. द्रौपदी जुगारात हरलेली होती, त्यानंतर तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी महाभारत घडले.ज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्राण गेले, आणि कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले.
कोर्टाने म्हटले की महिलेला संपत्ती मानण्याची मुर्खपणाचे परिणाम माहीती असताना देखील आपल्या समाजात स्रीला संपत्ती माणण्याची मानसिकतेला ही तेव्हाही लक्षात आली होती जेव्हा सुप्रीम कोर्टाने जोसेफ शाईन ( सुप्रा ) प्रकरणात कलम ४९७ आयपीसीला घटनाबाह्य जाहीर केले होते.’
पतीने काय आरोप ठेवले ?
तरुणाने भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 497 अंतर्गत त्याला समन्स पाठविण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते, तक्रारदार पतीने त्याची पत्नी त्या युवकासोबत लखनऊच्या एका हॉटेलात गेली आणि त्याने तेथे तिच्या सोबत जबदस्ती केल्याचा आरोपही पतीने केला होता. पतीने या तरुणाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी युवकाला खालच्या कोर्टाने निर्दोष सोडले होते. त्यानंतर पतीने पुन्हा फेर याचिका केली. यावर सेशन कोर्टाने आरोपी युवकाला खटल्यासाठी समन्स पाठवले. त्यानंतर या प्रकरणाला या तरुणाने दिल्ली येथील हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर हायकोर्टाने ही याचिका निकाली काढत तरुणाला निर्दोष मुक्त केले.
