रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात; पूल तोडून रेल्वे नदीत कोसळली; 800 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

भारतीय रेल्वे इतिहासातील सर्वात भयंकर अपघात घडला होता. या अपघाताने संपूर्ण देश हादरले. अपघातामुळे रेल्वेचे शेवटचे 7 डबे त्यापासून विभक्त झाले व नदीत पडले. (The biggest train accident; The bridge broke and the train crashed into the river; More than 800 passengers died)

रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात; पूल तोडून रेल्वे नदीत कोसळली; 800 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू
रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात; पूल तोडून रेल्वे नदीत कोसळली; 800 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

नवी दिल्ली : दरवर्षी भारतात शेकडो लोक रेल्वे अपघातात मरण पावतात. तथापि, गेल्या काही वर्षांपासून रेल्वे अपघाताचे आणि मृत्यूची संख्याही बरीच कमी झाली आहे. देशात रेल्वे अपघातांची अनेक कारणे आहेत. या अपघातांमध्ये तांत्रिक बिघाड, मानवी चूक, निष्काळजीपणा, खराब हवामान इत्यादींचा समावेश आहे. सरकारी आकडेवारीनुसार वर्ष 2019 हे रेल्वे अपघातांच्या बाबतीत खूपच सुरक्षित होते. भारतीय रेल्वेच्या इतिहासात 166 वर्षानंतर पहिल्यांदा असे घडले. पण, देशात एक असा रेल्वे अपघात झाला होता, जो अविस्मरणीय आहे. या रेल्वे अपघाताने केवळ देशच नव्हे तर संपूर्ण जग हादरले होते. (The biggest train accident; The bridge broke and the train crashed into the river; More than 800 passengers died)

6 जून 1981 रोजी घडलेला होता हा भीषण अपघात

भारतीय रेल्वे इतिहासातील सर्वात भयंकर अपघात घडला होता. या अपघाताने संपूर्ण देश हादरले. 6 जून 1981 रोजी संध्याकाळची वेळ होती. त्या दिवसांत पावसाळा चालू होता. नऊ डब्ब्यांची पॅसेंजर ट्रेन प्रवाशांनी खच्चाखच भरली होती. 416dn ही गाडी मानसीहून सहरसाकडे जात होती. ही गाडी बदला घाट ते धमरा घाट स्थानक दरम्यान बागमती नदीवरुन जात असतानाच भीषण अपघात झाला. बागमती नदीवरील 51 क्रमांकाच्या पूलावर अपघातग्रस्त झाली. अपघातामुळे रेल्वेचे शेवटचे 7 डबे त्यापासून विभक्त झाले व नदीत पडले. पावसामुळे बागमतीची पाण्याची पातळी वाढली होती, त्यामुळे ट्रेन पलटी होताच नदीत बुडाली.

रेल्वेचे 7 डबे बागमती नदीत बुडाले

या अपघातानंतर जेव्हा रेल्वेचे 7 डबे नदीत कोसळले तेव्हा प्रवाशांची एकच किंचाळी सुरु झाली. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते, परंतु त्यावेळी त्यांना वाचवणारे कोणी नव्हते. आसपासचे लोक नदीजवळ पोहचेपर्यंत शेकडो लोक नदीत बुडून मृत्यू पावले होते. हा अपघात भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात आणि जगातील दुसरा सर्वात मोठा अपघात असल्याचे म्हटले जाते. या भीषण रेल्वे अपघातानंतर कित्येक दिवस शोधमोहीम चालू होती. गोताखोरांनी 5 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर नदीतून 200 हून अधिक मृतदेह बाहेर काढले. असं म्हणतात की अनेक मृतदेह रेल्वेच्या वेगवेगळ्या भागात अडकले होते. याशिवाय नदीच्या प्रवाहात अनेक लोकांचे मृतदेह वाहून गेले. सरकारी आकडेवारीवरून अपघातात जवळपास 300 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर प्रत्यक्षदर्शींच्या मते देशातील या सर्वात मोठ्या रेल्वे अपघातात 800 जणांचा बळी गेला.

अपघाताची अनेक कारणे सांगितली जातात

6 जून 1981 रोजी घडलेल्या या अपघाताची अनेक कारणे सांगितली जातात. कुणी म्हणते जोरदार वादळामुळे हा अपघात झाला तर कुणी म्हणते नदीत अचानक आलेल्या पुरामुळे ट्रेन कोसळली. या व्यतिरिक्त काही लोक असेही म्हणतात की पुलावर गाय वाचवण्यासाठी लोको पायलटने अचानक वेगवान ब्रेक लावले, ज्यामुळे रेल्वेचे शेवटचे 7 डबे पलटी झाले व पूल तोडून नदीत पडले आणि बुडाले. या रेल्वे अपघातास 40 वर्षे पूर्ण झाली. (The biggest train accident; The bridge broke and the train crashed into the river; More than 800 passengers died)

इतर बातम्या

शक्ती कायद्यासाठी धडपड, तृतीयपंथीयांच्या आरक्षणासाठी प्रयत्न; कोण आहेत आमदार प्रतिभा धानोरकर? जाणून घ्या!

‘मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी मोदींबाबत 3 गोष्टी स्पष्ट केल्या’, पाटल्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा