AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगालच्या मुली आता गप्प बसणार नाहीत, बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे विधान

Dharmendra Pradhan : भाजपने बंगालमधील पानिहाटी मतदारसंघातून आर जी कर मेडिकल कॉलेज रेप-मर्डर प्रकरणातील पीडितेची आई रत्ना देबनाथ यांना उमेदवारी दिली आहे. यावर धर्मेंद्र प्रधान यांनी भाष्य केले आहे.

बंगालच्या मुली आता गप्प बसणार नाहीत, बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे विधान
Dharmendra PradhanImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 25, 2026 | 11:39 PM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 19 उमेदवारांची नावे आहेत, ज्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाने उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील महत्त्वाची मानली जाणारी पानिहाटी मतदारसंघातून आर जी कर मेडिकल कॉलेज रेप-मर्डर प्रकरणातील पीडितेची आई रत्ना देबनाथ यांना उमेदवारी दिली आहे. यावर बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान ?

धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, रत्ना देबनाथ यांना भाजपने पानिहाटी येथून निवडणूक मैदानात उतरणे ही केवळ उमेदवारी नाही, तर बंगालच्या मुली आता गप्प बसणार नाहीत, याची ती एक ठाम घोषणा आहे. एका आईच्या दुःखाने आता न्यायासाठीच्या अढळ लढ्यात रूपांतर घेतले आहे. त्यांचा आवाज आता न्याय, सन्मान आणि राज्यभरातील महिलांच्या सुरक्षेसाठीच्या चळवळीत परिवर्तित झाला आहे.

महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांच्या वारंवार झालेल्या अपयशामुळे जनतेचा विश्वास ढासळला आहे. त्यांच्या कारकिर्दीत असंख्य आवाज दाबले गेले, प्रत्येक आवाज ही त्या व्यवस्थेच्या अपयशाची जाणीव करून देतो, जी आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरली आहे. ही फक्त निवडणूक नाही, हा नैतिक हिशेब आहे. एका आईचे धैर्य आता एका मोडकळीस आलेल्या व्यवस्थेला थेट आव्हान देत आहे. वैयक्तिक दुःखाला सामूहिक न्याय, जबाबदारी आणि बंगालमधील प्रत्येक मुलीसाठी दीर्घकालीन बदलाच्या मागणीत रूपांतरित करत आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत 23 एप्रिल आणि 29 एप्रिल 2026 रोजी होणार असून निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. बंगाल निवडणुकांसाठी भाजपने आपल्या पहिल्या यादीत 144 आणि दुसऱ्या यादीत 111 उमेदवारांची घोषणा केली होती. 19 नावांच्या तिसऱ्या यादीसह पक्षाने आतापर्यंत एकूण 274 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण 294 जागा आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?