AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या बायकोने केली फसवणूक तर 90 दिवसांत केली 3 लग्न, त्यात दोघींनीही तोडलं ह्रद्य म्हणून केली आत्महत्या

मृत खेमराज याच्या मुलाने सांगितले की तो लहान असताना खेमराजची पहिला बायको, त्या दोघांनाही सोडून एका माणसासोबत पळून गेली होती. त्यानंतर खेमराजने काही दिवस लग्न केले नाही. नंतर मात्र त्याने तीन महिन्यांत तीन लग्न केली होती. यातल्या एका पत्नीचा मृत्यू झाला.

पहिल्या बायकोने केली फसवणूक तर 90 दिवसांत केली 3 लग्न, त्यात दोघींनीही तोडलं ह्रद्य म्हणून केली आत्महत्या
Marriage Viral EntryImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 3:50 PM
Share

उदयपूर – एका माणसानं 90 दिवसांत (90 days) तीन लग्न (marriage)केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यातल्या दोन बायकांनी या माणसाला सोडून दिलं तर तिसऱ्या पत्नीचा मृत्यू झाला. यामुखे दु:खी झालेल्या या तरुणानं फाशी घेऊन आत्महत्या (Suicide)केली आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांत तीन लग्न करुनही आपल्याला सुख मिळाले नाही, यामुळे हा तरुण तणावात होता, असे सांगण्यात येते आहे. याचमुळे दु:खात असलेल्या या तरुणानं आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते आहे. या तरुणाचा मृतदेह फतहसागर परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. रस्त्यावरील जाणाऱ्य़ा-येणाऱ्यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमा झाली. त्यानंतर ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचले, त्यांनी झाडावर लटकत असलेला मृतदेह खाली काढला आणि त्यानंतर पोस्टमार्टेमसाठी मृतदेह पाठवण्यात आला. मृत तरुणाचे नाव खेमराज असे असून, तो 42 वर्षांचा होता. ऑटो रिक्षा चालवून तो कुटुंबाची गुजराण करीत होता.

पहिल्या बायकोने सोडले तर तीन महिन्यांत केली 3 लग्न

मृत खेमराज याच्या मुलाने सांगितले की तो लहान असताना खेमराजची पहिला बायको, त्या दोघांनाही सोडून एका माणसासोबत पळून गेली होती. त्यानंतर खेमराजने काही दिवस लग्न केले नाही. नंतर मात्र त्याने तीन महिन्यांत तीन लग्न केली होती. यातल्या एका पत्नीचा मृत्यू झाला.

दोन बायका दुसऱ्यांसोबत झाल्या फरार

तीन महिन्यांत केलेल्या दोन बायका इतर दोन पुरुषांसोबत निघून गेल्याचे खेमराजच्या मुलाने सांगितले. या दोघीही निघून गेल्यानंतर खेमराज जास्त तणावात होत्या. तो कुणाशी फारसा बोलतही नव्हता. यातूनच हताश झालेल्या खेमराजने आत्महत्येचं पाऊल उचललं असेल, अशी शक्यता त्याच्या मुलानं वर्तवली आहे. तर या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासानंतरच खेमराजने आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.