CBI: 100 कोटी रुपयांत राज्यसभेची खासदारकी देतो, असे सांगणारी गँग अटकेत, एक भामटा महाराष्ट्राचा, राज्यपालपदाचीही देत होते ऑफर

नुकताच राज्यातही असाच एक प्रकार समोर आला होता अशी माहिती आहे. एका भाजपाच्या आमदाराकडे 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याबदल्यात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात आली होती. या प्रकरणात आमदाराने केलेल्या तक्रारीनंतर क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खंडणी वसुलीच्या प्रकरणात चार जणांना अटक केली होती.

CBI: 100 कोटी रुपयांत राज्यसभेची खासदारकी देतो, असे सांगणारी गँग अटकेत, एक भामटा महाराष्ट्राचा, राज्यपालपदाचीही देत होते ऑफर
राज्यसभा खासदारकीसाठी १०० कोटींची मागणी Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 7:54 PM

नवी दिल्ली- 100 कोटी रुपयांत राज्यसभेची खासदारकी (Rajya Sabha MP)देतो किंवा राज्यपाल करतो, असे सांगू फसणवूक करणारी टोळी गाजाआड झाली आहे. सीबीआयने (CBI) ही मोठी कारवाई करत चारपेक्षा जास्त जणांना या प्रकरणी (Four arrested)अटक केली आहे. सीबीआयची टीम गेल्या काही दिवसांपासून या टोळीवर लक्ष ठेवून होती. पैशांचा व्यवहार होण्याच्या काही क्षणांपूर्वी सीबीआयने या आरोपींना अटक केली आहे. आता या टोळीची चौकशी करण्यात येते आहे. त्यांच्या इतर साथईदारांचीही माहिती आता सीबीआयच्या टीमला मिळते आहे. चारपेक्षा जास्त जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून, अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. सध्यातरी 100 कोटी रुपयांत हा सगळा व्यवहार ठरल्याचे समोर आले आहे.

फोन टॅपिंगमधून काढला माग

सीबीआय अधिकारी गेल्या काही काळापासून या आरोपींचे फोन इंटरसेप्टरच्या माध्यमातून ऐकत होते. गेल्या अनेक दिवसांपासून या आरोपींवर त्यांची नजर होती. हा व्यवहार जेव्हा अखेरच्या टप्प्यात होता त्याचवेळी सीबीआयने सापळा रचून या चौघांना अटक केली आहे.

आरोपींपैकी एक जण महाराष्ट्रातील

सीबीआयने या प्रकरणात चौघा आरोपींची ओळख पटवलेली आहे. यातील एक जण महाराष्ट्रातील आहे, त्याचे नाव कमलाकर बांदगर असे आहे. दुसरा आरोपी कर्नाटकातील आहे, त्याचे नाव रवींद्र विठ्ठल नाईक असे आहे. तर दिल्लीतील महेंद्र पाल अरोरा आणि अभिषेक बुरा हे सगळेजण या व्यवहारात सामील असल्याचे समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातही घडला होता असा प्रकार

नुकताच राज्यातही असाच एक प्रकार समोर आला होता अशी माहिती आहे. एका भाजपाच्या आमदाराकडे 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याबदल्यात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात आली होती. या प्रकरणात आमदाराने केलेल्या तक्रारीनंतर क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खंडणी वसुलीच्या प्रकरणात चार जणांना अटक केली होती. या आरोपींनी तीन ते चार आमदारांसमोर ही मागणी ठेवली होती. हे चारही आरोपी राज्यातील रहिवासी होते. हातकणंगलेचा रहिवासी रियाज शेख, ठाण्यातील योगेश कुलकर्णी, मुंबईच्या नागपाड्यातील सागर संगवई आणि जफर रशिद उस्मानी अशी या चार आरोपींची नावे होती.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.